शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावती पोलीस ठाण्याची इमारत, सदनिकेसाठी ६ कोटी ६७ लाखांचा निधी

By admin | Updated: April 11, 2016 01:21 IST

भारतीय जनता पार्टीचे कोंढा-घोडपेठ जि.प. क्षेत्राचे सदस्य तथा बांधकाम व नियोजन समितीचे सदस्य विजय वानखेडे यांनी सातत्याने केलेल्या

केंद्र शासनाचा निधी : पोलीस कर्मचाऱ्यांत आनंदभद्रावती : भारतीय जनता पार्टीचे कोंढा-घोडपेठ जि.प. क्षेत्राचे सदस्य तथा बांधकाम व नियोजन समितीचे सदस्य विजय वानखेडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे भारत सरकारच्या माध्यमातून आधुनिकीकरण अंतर्गत निधीतून भद्रावती पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारत तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांचेसाठी असलेल्या निवासस्थान बांधकामाकरीता ६ कोटी ६७ लाख ४६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी भद्रावती शहरातील नवीन प्रशासकीय इमारत व कर्मचाऱ्यांच्या सदनिका बांधकामाबाबत असलेली अनास्था तब्बल सात वर्षांचा कालखंड लोटूनही व सदर जागेचा ताबा जिल्हा पोलीस अधिक्षकांननी घेऊनही निधी उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याची गंभीरपणे दखल घेत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचेकडे पत्राद्वारे सदर बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडेही त्यांनी पाठपुरावा करत राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही या प्रश्नात लक्ष घालण्याकरिता निवेदनाद्वारे विनंती केली होती. भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी त्याची दखल घेऊन संबंधितांकडे पत्रव्यवहार केला होता. अखेर या इमारत व निवासस्थान बांधकामाकरिता ६ कोटी ६७ लाख ४६ हजार रुपयांचा निधी निर्गमित करण्यात आल्याचे पत्र वानखेडे यांना पाठवून सदर बांधकामास १६ मार्च रोजी कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरूवात करण्यात आली आहे. भद्रावती येथे या निधीतून पोलीस ठाण्याची इमारत व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता ५२ निवासस्थान बांधण्यात येणार असल्याची माहिती वानखेडे यांनी दिली. सदर बांधकामास सुरूवात झाल्याने भद्रावती शहरात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्यांदाच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवासस्थानाची सोय होत असल्याने पोलीस विभागामध्ये आनंद व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)