५० वर्षीय शेतकरी गजानन घागीने संपवलं जीवन, शेतात घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 20:58 IST2023-09-23T20:58:31+5:302023-09-23T20:58:46+5:30
सेवा सहकारी सोसायटीकडून घेतलं होतं ४० हजार रुपयांचे कर्ज

५० वर्षीय शेतकरी गजानन घागीने संपवलं जीवन, शेतात घेतला गळफास
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील जामगाव खुर्द येथील शेतकऱ्याने शनिवारी (दि. २३) शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गजानन रामदास घागी (५०) असे मृताचे नाव आहे.
गजानन घागी यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यांनी शेतीसाठी सेवा सहकारी सोसायटीकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेऊन सोयाबीन व कपाशीची लागवड केली. कीडरोगाने सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाल्याने काही दिवसांपासून विवंचनेत होते, अशी माहिती आहे. वरोरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे, माजी संचालक संजय घागी यांनी मृतक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले व शासनाने मदत द्यावी, अशी मागणी केली.