राज्य सरकारकडे अडकले जीएसटी परताव्याचे ५ कोटी २९ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:00:54+5:30

चंद्रपूर महानगर पालिकेकडून दरवर्षी अत्यावश्यक बाबींवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. प्रामुख्याने कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी सर्वाधिक निधी आरक्षित ठेवावा लागतो. शिवाय, शहरातील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी आणि अन्य कामांसाठी निधी राखून आरक्षित ठेवले जाते. शिवाय विकास आराखड्यातील मंजूर कामांसाठी स्वतंत्र उभारला जातो.

5 crore 29 lakhs of GST refund stuck to the state government | राज्य सरकारकडे अडकले जीएसटी परताव्याचे ५ कोटी २९ लाख

राज्य सरकारकडे अडकले जीएसटी परताव्याचे ५ कोटी २९ लाख

Next
ठळक मुद्देचंद्रपूर मनपाची अर्थकोंडी : लॉकडाऊनमुळे मालमत्ता कर व जीएसटी परताव्यावरच मतदार

राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे उद्योग-व्यवसायांचे अर्थचक्र थांबले. लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता दिल्याने काही व्यवसाय सुरू झालेत. मात्र, आगामी आर्थिक वर्षात मनपाचे कोट्यवधींचे उत्पन्न घटणार आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी मनपाची मदार आता केवळ मालमत्ता कर आणि जीएसटी परताव्यावरच असणार आहे. विशेष म्हणजे जीएसटी परताव्याचा ५ कोटी २९ लाखांचा निधी राज्य सरकारकडून अद्याप मिळाला नाही. त्यामुळे मनपाला यापुढे विकासकामांचे प्राधान्यक्रमच बदलावे लागणार आहे.
चंद्रपूर महानगर पालिकेकडून दरवर्षी अत्यावश्यक बाबींवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. प्रामुख्याने कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी सर्वाधिक निधी आरक्षित ठेवावा लागतो. शिवाय, शहरातील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी आणि अन्य कामांसाठी निधी राखून आरक्षित ठेवले जाते. शिवाय विकास आराखड्यातील मंजूर कामांसाठी स्वतंत्र उभारला जातो. यंदा कोरोनामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नावर अनिष्ट परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने यंदा महानगर पालिकेला कोट्यवधींच्या महसुली उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. दर महिन्याला मनपाला जीएसटी परतावा म्हणून राज्य सरकारकडून रक्कम अदा केली जाते. जीएसटी परताव्याच्या माध्यमातून मनपाच्या तिजोरीत भर पडत असते. कोरोनामुळे उत्पन्न घटल्याने जीएसटी परताव्यावरच मनपाला अवलंबून राहण्याची वेळ आहे. तिजोरीत खळखळाट झाल्यास अत्यावश्यक कामे वगळून काही निर्माणाधिन व प्रस्तावित विकास कामांनाही गुंडाळून ठेवण्याची वेळ मनपावर येऊ शकते. अशा आर्थिक पेचप्रसंगात जीएसटी परतावा मोठा आधार आहे. मात्र, राज्य सरकारकडून ५ कोटी २९ लाख केव्हा मिळणार, याची मनपाला प्रतीक्षा आहे.

करवसुली फक्त ५८ टक्के
सन २०१८-१९ च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार ३४ कोटी ९१ लाख आणि सन २०१९-२० च्या अंदाजपत्रकानुसार ३४ कोटी ७२ लाखांचे उत्पन्न निधी विविध प्रकारच्या करातून मनपाला मिळाले. यामध्ये मालमत्ता कराचामोठा वाटा आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ५८ टक्के कर वसुली झाली. जानेवारी, फेबु्रवारी व मार्च महिन्यातच मोठी कर वसुली होते. लॉकडाऊनमुळे यंदाचे गणित बिघडले. मालमत्ता कर वसुलीसाठी डिमांड बूक छापण्याचे काम सुरू आहे. परंतु, कोरोनाचे संकट पूर्णत: टळल्यानंतरच पुढची कार्यवाही करावी लागणार आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी २ कोटी ३३ लाख
कोरोनाविरूद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मनपा जिल्हा नियोजन समितीकडून २ कोटी ३३ लाखांचा निधी मिळाला. यातून शहरात अनेक उपाययोजना केल्या जात आहेत, असा दावा मनपाने केला. स्वबळावर निधी उभारणे शक्य नसल्याने कोरोनावर मात करण्यासाठी पुन्हा सुमारे १२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्राने दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मनपाकडून विविध प्रतिबंध उपाययोजना सुरू आहेत. यंदा कर वसुलीवर अनिष्ट परिणाम झाला आहे. राज्य शासनाकडून जीएसटी परताव्याची रक्कम मनपाला येणे बाकी आहे.
- राजेश मोहिते,
आयुक्त, मनपा, चंद्रपूर

Web Title: 5 crore 29 lakhs of GST refund stuck to the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.