शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

चंद्रपुरातील ४ हजार ९०९ घरे बंद; ४८८ कुटुंबीयांचा माहिती देण्यास नकार; मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण पूर्ण

By साईनाथ कुचनकार | Updated: February 4, 2024 16:37 IST

...यामध्ये ४ हजार ९०९ घरे बंद आढळली असून, ४८८ कुटुंबीयांनी सर्वेक्षणास नकार दिला. त्यामुळे शहरात ९३.२७ टक्के कुटुंबांची माहिती गोळा होऊ शकली.

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण केले. यामध्ये ४ हजार ९०९ घरे बंद आढळली असून, ४८८ कुटुंबीयांनी सर्वेक्षणास नकार दिला. त्यामुळे शहरात ९३.२७ टक्के कुटुंबांची माहिती गोळा होऊ शकली.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर शहरातील २३ फेब्रुवारी २०२४ पासून मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. हे सर्वेक्षण २ फेब्रुवारीला पूर्ण झाले. चंद्रपूर शहरातील ८० हजार ९५१ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी सुमारे ८७४ कर्मचारी कार्यरत होते. सर्वेक्षणाचे उद्दिष्ट गाठून ३ फेब्रुवारी २०२४ रोजी चंद्रपूर मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले, अशी माहिती महानगरपालिका उपायुक्त अशोक गराटे यांनी दिली.

राज्य मागासवर्ग आयोगाने पाठविलेल्या मास्टर ट्रेनरने महानगरपालिकेतील नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी आणि मास्टर ट्रेनर यांना प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर महानगरपालिकेचे नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी आणि मास्टर ट्रेनर यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाबाबतचे प्रशिक्षण दिले होते.

सर्वेक्षणादरम्यान एकूण १६० ते १८२ प्रश्न विचारण्यात आले. मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेण्यात आली. सदर माहिती मूलभूत, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक होती. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याचे समजल्यानंतर प्रगणकाने त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली नाही. ही कार्यवाही आयुक्त विपीन पालीवाल व अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात करण्यात आली.

सर्वेक्षणाबाबत नागरिकांमध्ये शंका३१ जानेवारीपर्यंत ५६ हजार २४६ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते. जी घरे बंद होती त्यांना कर्मचाऱ्यांनी पुन्हा भेट दिली होती. मात्र त्यातील काही घरे बंदच असलेली आढळली. त्याचप्रमाणे सर्वेक्षणास नकार देणाऱ्या कुटुंबांची कर्मचाऱ्यांनी पुन्हा भेट घेऊन त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. सर्वेक्षणदरम्यान काही नागरिकांमध्ये या सर्वेक्षणाबाबत भीती व शंका - कुशंका असल्याचे जाणवल्याचेही महापालिकेने म्हटले आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षण