शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

३९५ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

चंद्रपूर जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणाचा त्वरित निकाल लागावा यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेकवेळा तडजोड करण्यात आली. मात्र प्रत्येकवेळीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्रकरणे रखडत गेली.

ठळक मुद्दे लोकअदालत : १ कोटी ६३ लाख ६७ हजारांची तडजोड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणाचा त्वरित निकाल लागावा यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेकवेळा तडजोड करण्यात आली. मात्र प्रत्येकवेळीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्रकरणे रखडत गेली. दरम्यान, यावेळी आयोजित लोकअदालतमध्ये तडजोड करून ३९५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामुळे पक्षकारांना दिलासा मिळाला असून कोर्टकचेरीची पायपीट थांबली आहे.जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार या राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित समझोतायोग्य प्रकरणे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची तसेच न्यायालयात येण्याअगोदरची प्रकरणे ठेवण्यात आली. यामध्ये विविध बँका, विमा कंपनी, वीज वितरण कंपनी, बी.एस.एन.एल. कंपनींचे अधिकारी आणि पक्षकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रतिसाद दिला.आपले वाद आपसी समझोत्याने निकाली काढण्याकरिता त्यांनी आपसात चर्चा केली आणि सामंजस्याची भूमिका घेऊन तडजोडीने वाद मिटविले. परिणामस्वरुप या लोक अदालतमध्ये न्यायालयीन प्रलंबित २३९ प्रकरणे आणि दाखलपूर्व १५६ प्रकरणे असे एकूण ३९५ प्रकरणे एकाच दिवशी निकाली निघाले. सदर प्रकरणांमध्ये एकूण १ कोटी ६३ लाख ६७ हजार ६७८ मुल्यांच्या वादाबाबत तडजोड झाली.या लोक अदालतीमध्ये प्रकरणांचा निपटारा करण्याकरिता जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रभाकर मोडक आणि के. पी. श्रीखंडे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर शिवकांत काळे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एम. ए. शिलार, कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश एस. झेड. खान, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. भटेवरा, एस. एस. कुळकर्णी, एन. व्ही. रणवीर व एस. डी. मुक्कनवार यांनी पॅनल न्यायाधीश म्हणून काम पाहिले.सामंजस्याची भूमिका हाच उद्देश : शिंदेसामंजस्याची भूमिका घेऊन तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालत कार्य करीत असते. यासाठी दोन्ही बाजूकडील म्हणणे ऐकूण घेत तोडगा काढून सामंजस्याची भूमिकेतून प्रकरणाचा निपटारा केला जात असल्याचे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनकर शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सदर प्रकरणांमध्ये एकूण रुपये १ कोटी ६३ लाख ६७ हजार ६७८ इतक्या मूल्याच्या वादांवर तडजोड झाली. लोकअदालतीच्या माध्यमातून दोन्ही पक्षकारांचे समाधान होत असून यातून वेळ, खर्चाची बचत होते.

टॅग्स :Courtन्यायालय