शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थेचे ३९ कोटी रुपये परत जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

नगरपरिषद, नगरपंचायत, चंद्रपूर महानगरपालिकेला विकासाकरिता राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता. वैशिष्ट्यपूर्ण विशेष रस्ता निधी, पर्यटन, अनुदान, नगरपंचायतींना विशेष अनुदान आदी विविध योजने अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला. निवडणूक आचार संहीता लागण्यापूर्वी लगभगीने चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाकडे निधी आला.

ठळक मुद्देवर्क आर्डरला स्थगिती : बल्लारपूर, मूल, वरोरासह महानगरपालिकेला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मागील सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका व नगर पंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. या निधीतील काही कामांच्या निविदा निघाल्या. परंतु वर्कआर्डर थांबविण्याचे आदेश नव्या सरकारने दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ३९ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नगरपरिषद, नगरपंचायत, चंद्रपूर महानगरपालिकेला विकासाकरिता राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता. वैशिष्ट्यपूर्ण विशेष रस्ता निधी, पर्यटन, अनुदान, नगरपंचायतींना विशेष अनुदान आदी विविध योजने अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला. निवडणूक आचार संहीता लागण्यापूर्वी लगभगीने चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाकडे निधी आला. या निधीतून तातडीने कामे मंजुर करुन चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकांने विकास कामांचे उद्घाटनही उरकले. उर्वरित निधी आचारसंहिता संपल्यानंतर मार्गी लावण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकार स्थापण्याकरिता विलंब झाला. काही दिवस राष्टÑपती राजवट राज्यात लागू झाली. त्यामुळे निधीचे नियोजन करताच आले नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे ३९ कोटी रुपयांचा निधी शिल्लक राहिला. जिल्ह्यात सर्वाधिक निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या योजनेनुसार खर्च करण्यात आल्याची ओरडही झाली होती. परंतु शहराचा विकास होत असल्यामुळे कुणीही यामध्ये राजकारण आणले नाही. मात्र त्यानंतर नव्या सरकारने सन २०१९-२० या वर्षामध्ये शिल्लक असलेल्या निधीमधील कामाचे वर्क आर्डर थांबविण्याचे आदेश दिल्याने सदर निधी परत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.निधी परत जाण्याचा सर्वाधिक फटका चंद्रपूर महानगरपालिका, बल्लारपूर, मूल, वरोरा या नगरपालिकांना सर्वाधिक बसल्याचे समजले असून आता स्थानिक पदाधिकारी एकमेकांकडे बोटे दाखवून हातवर करीत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.नव्या शासनाचा हा निर्णय चुकीचा आहे. विदर्भातील स्थानिक विकास स्वराज्य संस्थेकडे मोठ्या प्रमाणात निधी आला होता. सदर निर्णयाने विकास कामात अडथळा होणार असून याबाबत दाद मागणार.- अहेतेश्याम अली,नगराध्यक्ष, वरोरा