शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेकडून योजनांसाठी 207 कोटी 61 लाखांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

 देशात कोरोना महामारीचे संकट उद्भवल्याने राज्याच्या वित्त विभागाने विकास योजनांच्या निधीत मोठी कपात केली. कल्याणकारी योजनांचा निधी  केवळ कोविड १९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वळविला. त्यामुळे आरोग्य योजनांचा अपवाद वगळल्यास सर्वच योजना ठप्प झाल्या आहेत. कोरोनाचे संकट आता दूर होऊ लागले, शासनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी वापरावरील बंधने शिथिल केली.

ठळक मुद्देजिल्हा वार्षिक योजना : निधी वापरातील बंधने शिथिल; बांधकामासाठी ७१ कोटी

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील  विकासकामांवर अनिष्ट परिणाम झाला. समूह व व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना सध्या तरी नावापुरत्याच  राहिल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२१-२२ वर्षात सर्वसाधारण योजनांसाठी २०७ कोटी ६१ लाख ८० हजारांचा प्रस्ताव तयार केला. याशिवाय आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील योजना व  विशेष घटक योजनांसाठी अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी विभागनिहाय प्रस्ताव तयार केले. शासनाने निधी वापरातील बंधनेही आता शिथिल केली. जिल्हा  वार्षिक योजनांसाठी राज्य शासनाकडून किती निधी मिळतो, यावरही बरेच अवलंबून आहे. देशात कोरोना महामारीचे संकट उद्भवल्याने राज्याच्या वित्त विभागाने विकास योजनांच्या निधीत मोठी कपात केली. कल्याणकारी योजनांचा निधी  केवळ कोविड १९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वळविला. त्यामुळे आरोग्य योजनांचा अपवाद वगळल्यास सर्वच योजना ठप्प झाल्या आहेत. कोरोनाचे संकट आता दूर होऊ लागले, शासनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी वापरावरील बंधने शिथिल केली.  परिणामी, जिल्हा परिषदेच्या आठही विभागांतील अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी नुकताच योजनांसाठी  निधी प्रस्तावित केला. त्यामध्ये सर्वसाधारण योजना प्रारूपात पशुसंवर्धन, सिंचन, समाज कल्याण, आरोग्य, बालकल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बांधकाम,  पाणीपुरवठा, स्वच्छता व पाणी पुरवठा, पंचायत विभागातील योजनांसाठी २०७ कोटी ६१ लाख ८० हजारांचा प्रस्ताव तयार केला. आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील योजना व  विशेष घटक योजनांसाठीही स्वतंत्र प्रस्ताव आहेत.असा होताे निधी मंजूर जि. प. च्या विभागप्रमुखांनी योजनांसाठी लागणारा निधीचा प्रस्ताव जिल्हा  नियोजन समितीच्या सभेत मांडण्यात येईल. या समितीकडे उपलब्ध निधीचा विचार करून संबंधित विभागांना आवश्यकतेनुसार वितरण करण्यास मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य समितीकडे जाईल. यासाठी राज्याच्या वित्त विभागाचा निर्णय अंतिम आहे. २०१९-२० या वर्षात  नियोजन समितीने  जि. प. ला अल्प  निधी कमी दिल्याचा पदाधिकाऱ्यांनी उघडपणे आरोप केला होता, हे विशेष. जि. प. च्या सर्वच विभागाचे प्रस्ताव तयार झाले आहेत. या प्रस्तावावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चेनंतर पुढील कार्यवाही होणार आहे. या प्रस्तावात मंजूर नियतव्यय, योजनांसाठी अपेक्षित खर्च, कमाल आर्थिक मर्यादेनुसार प्रस्तावित नियतव्ययाचा समावेश करण्यात आला आहे.- अशोक मातकर, वित्त व लेखा अधिकारी, जि. प. चंद्रपूर.

टॅग्स :zpजिल्हा परिषद