शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

२०,४४८ बाधित झाले कोरोनातून बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१ हजार ५५७ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २० हजार ४४८ झाली आहे. सध्या ७७० बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६२ हजार १४२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ३८ हजार ५६० नमुने निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्दे९८ कोरोनामुक्त, १०० नव्या रुग्णांची भर

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर  : जिल्ह्यात ९८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १०० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१ हजार ५५७ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २० हजार ४४८ झाली आहे. सध्या ७७० बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६२ हजार १४२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ३८ हजार ५६० नमुने निगेटिव्ह आले आहेत.बुधवारी मृत झालेल्यांमध्ये नागभीड तालुक्यातील ६० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३९ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३१२, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १६, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.बुधवारी बाधित आलेल्या १०० रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ४९, चंद्रपूर तालुक्यातील तीन, बल्लारपूर तीन, भद्रावती ११, ब्रम्हपुरी चार, नागभीड एक, सिंदेवाही चार, मूल आठ, सावली एक,  राजुरा पाच, चिमूर चार, वरोरा पाच व कोरपना येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे. तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.मागील काही दिवसांपासून नागरिक कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाही. अनेकजण कोरोना संसर्ग संपुष्टात आल्यासारखे वागत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या