शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

२०३ महिलांना मिळणार ग्रा.पं. सदस्य पदाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST

नागभीड तालुक्यात पूर्वी ६५ ग्रामपंचायती होत्या. यातील ९ ग्रामपंचायती नागभीड नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आल्याने तालुक्यात आता ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील जवळपास ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक जुलै महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनागभीड तालुका : ४३ ग्रामपंचायतींची जुलै अखेरीस निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : जुलै महिन्याच्या अखेरीस नागभीड तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. यासाठी प्रभागनिहाय सदस्यांचे आरक्षण काढण्यात आल. यात २०३ महिलांना ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून संधी मिळणार आहे.नागभीड तालुक्यात पूर्वी ६५ ग्रामपंचायती होत्या. यातील ९ ग्रामपंचायती नागभीड नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आल्याने तालुक्यात आता ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील जवळपास ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक जुलै महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.पूर्वतयारी म्हणून प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्वच ग्रामपंचायतींच्या सदस्यांचे प्रभागनिहाय आरक्षण पाडले आहेत आणि ते जाहीरही करण्यात आले आहेत. या ४३ ग्रामपंचायतीसाठी एकूण ३६३ सदस्यांची निवड होणार आहे. यात २०३ महिला आहेत. विविध प्रवर्गाचा विचार करता अनु.जाती प्रवर्गातून १९ महिलांची निवड करण्यात येणार आहे. अनु.जमाती प्रवर्गातून ४१ , ना.मा.प्र.प्रवर्गातून ४७ तर सर्वसाधारण प्रवर्गातून ९६ महिलांची सदस्य म्हणून निवड होईल.यापूर्वी नागभीड तालुक्यातील १३ ग्राम पंचायतींच्या सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात आली होती. मधल्या काळात राज्य सरकारने ही पद्धत बंद करून जुन्याच पद्धतीने म्हणजे सदस्यांमधून सरपंच निवडीचा कायदा केल्याने या ४३ ग्राम पंचायतींच्या सरपंचांची निवड सदस्यांमधून होणार आहे. त्यामुळे सरपंच निवडीची रंगत अधिक वाढणार आहे.गावांचा कारभार महिलांच्या हाती४३ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून यातील अनेक गावांमध्ये महिलांच्या हाती गावांचा कारभार राहणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण अद्याप तरी जाहीर व्हायचे आहे. त्यामुळे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होताच गावांतील चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत