शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तरुणीचे शिर शोधण्यासाठी २०० पोलिसांची फौज तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 11:38 IST

शिर न सापडल्याने मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना २४ तासांनंतरही यश आले नाही. तरुणीचे मुंडके कापूनही घटनास्थळी रक्त नाही, यावरुन इतरत्र हत्या करून धड आणून टाकल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

ठळक मुद्दे२४ तासांनंतरही तपास शून्य नागपूरचे विशेष पोलीस महासंचालक भद्रावतीत

भद्रावती (चंद्रपूर) : निर्वस्त्र अवस्थेत तरुणीचे शिरावेगळे धड आढळलेल्या घटनेला २४ तास लोटूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील पाेलीस अधिकाऱ्यांसह सुमारे २०० पोलीस या तपासात गुंतले आहेत. तपास कोणत्या दिशेने सुरू आहे, याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.

मंगळवारी सायंकाळी नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी भद्रावती गाठून सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत ते काय निर्देश देतात यावरून तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. तरुणीचे मुंडके कापूनही घटनास्थळी रक्त आढळले नाही, यावरुन इतरत्र हत्या करून धड आणून टाकल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अतिशय क्रूर पद्धतीने खून केल्याची घटना सोमवारी भद्रावतीत उघडकीस आली. सुमारे २५ वर्षीय वयाच्या तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत धडापासून शिर वेगळे केलेला मृतदेह आढळला. या घटनेत मारेकऱ्यांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा क्रूर पद्धतीने खून केला असावा, अशी चर्चा आहे; परंतु शिर न सापडल्याने मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना २४ तासांनंतरही यश आले नाही. ही तरुणी कोण आहे? याबाबत अद्याप कोणीही पुढे आले नाही. ही बाब तपासात मोठी अडसर ठरत आहे. पोलिसांनी सर्व बाजूने तपासाला गती दिलेली आहे. सुमारे २०० पोलीस अधिकारी व पोलीस या तपासात गुंतले आहेत. ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.

या घटनेचे गांभीर्य ओळखून नागपूरचे विशेष पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे हेसुद्धा भद्रावतीत दाखल झाले आहेत. फिंगरप्रिंट एक्स्पर्ट, फॉरेन्सिक टीम, श्वान पथक वेग वेगळ्या दिशेने तपास करीत आहेत, अशी माहिती ठाणेदार गोपाल भारती यांनी दिली.

शहरात अफवांना पेव

ही घटना उघडकीस आल्यापासून बेपत्ता असलेल्या मुलींबाबत चर्चांना पेव फुटले आहे. मात्र, अद्याप कोणीही पुढे आलेले नाही. पोलिसांकडून बेपत्ता मुलीचा शोध सुरू आहे.

निर्वस्त्र छायाचित्र व्हायरल झाल्याने संताप

शिर नसलेल्या निर्वस्त्र मृतदेहाचे छायाचित्र काहींनी जणांनी समाज माध्यमांवर व्हायरल केले आहे. हे छायाचित्र पोलिसांसमक्ष काढले गेले आहे. या घटनेने जनमाणसांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ज्यांनी हे छायाचित्र व्हायरल केले त्यांचा पोलिसांनी शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोग मुंबईच्या चंद्रपूर जिल्हा समन्वयक वनिता घुमे, विवेकानंद स्पोर्टिंग क्लबचे राजेश मते, सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर, डॉ. भीमराव आंबेडकर, युथ क्लबचे संदीप जीवने यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूchandrapur-acचंद्रपूरPoliceपोलिस