अन् ‘त्या’ २० बेरोजगारांना मिळाला रोजगार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कल्पना
By परिमल डोहणे | Updated: February 18, 2024 15:21 IST2024-02-18T15:20:47+5:302024-02-18T15:21:23+5:30
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या २० उमेदवारांना चंद्रपूर, नागपूरसह परराज्यातील नामांकित ठिकाणी रोजगार प्राप्त झाला आहे.

अन् ‘त्या’ २० बेरोजगारांना मिळाला रोजगार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कल्पना
चंद्रपूर : चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूरतंर्गत वनपरिक्षेत्र चिचपल्लीमधील मौजा-उथळपेठ येथील बेरोजगारांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार चिचपल्ली वनपरिक्षेत्रातर्फे वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूर येथे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्यातर्फे २० बेरोजगारांना १ महिना १५ दिवसांचे हाऊस किपिंगचे प्रशिक्षण दिले होते. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या २० उमेदवारांना चंद्रपूर, नागपूरसह परराज्यातील नामांकित ठिकाणी रोजगार प्राप्त झाला आहे.
वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून निसर्ग पर्यटनस्थळ उथळपेठ (इको टुरिझम) साकारण्यात येत आहे. या गावातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनात चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका आर. वेलमे, जानाळ्याचे वनरक्षक आर. जे. गुरनुले यांनी पुढाकार घेऊन उथळपेठ व सभोवतालचे गावातील सुशिक्षित २० युवकांची निवड केली.
वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूर येथे २० सुशिक्षित बेरोजगारांना वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूर येथे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्यामार्फत १ महिना १५ दिवसा हाऊस किपिंगचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीचे संचालक एम. एस. रेड्डी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. त्याआधारावर त्या २० ही तरुणांना महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील विविध हॉटेलमध्ये हाऊस किपिंगकरिता निवड झाली आहे.
यांची झाली निवड
आकाश मोहुर्ले, चिरोली, लोकेश सुरपाम, चिचपल्ली, विपीन मोहुर्ले, कांतापेठ, सिद्धार्थ वाळके, नलेश्वर, स्वप्निल सातपुते उथळपेठ यांना रामोजी फिल्म सिटी, हैद्राबाद येथे निवड झाली. प्रणय मोहुर्ले चिरोली, वैभव जंपलवार चिरोली, सोमेश्वर मोहुर्ले, खेमेश्वर रविंद्र सातपुते उथळपेठ, सतीन सोनवानी कांतापेठ, अमित मांदाडे कांतापेठ, योगेश मांदाडे कांतापेठ, सूरज भेंडारे, साहिल मेश्राम यांची ताडोबा येथे तर राजकुमार देऊरमले उथळपेठ, सलीम मडावी नलेश्वर, मयूर झाडे नलेश्वर, श्रीकांत सातपुते उथळपेठ यांची नागपूर, काशिनाथ कुळमेथे, प्रफुल गेडाम यांची गोवा येथे निवड झाली आहे.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील उथळपेठ परिसरातील बेरोजगारांना रोजगाराच्या दृष्टीने हाऊस किपिंगचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र वितरित केले होते. त्याआधारावर त्या संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांना चंद्रपूर, नागपूरसह परराज्यात रोजगार मिळाला आहे. -प्रियंका वेलमे, वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली