शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

वीज परिमंडळातील २ हजार ७५५ ग्राहक झाले वसुंधरा-पर्यावरण-स्नेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST

दरवर्षी हजारो क्विंटल कागद येणकेणप्रकारेन छपाईसाठी सर्वत्र वापरला जातो. अशाप्रकारे छापील कागदाचा ऱ्हास होतो; पण महावितरणद्वारा ‘गो-ग्रीन’ ...

दरवर्षी हजारो क्विंटल कागद येणकेणप्रकारेन छपाईसाठी सर्वत्र वापरला जातो. अशाप्रकारे छापील कागदाचा ऱ्हास होतो; पण महावितरणद्वारा ‘गो-ग्रीन’ योजनेत छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’चा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे.

त्यामुळे प्रत्येक वीज ग्राहकांची वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय वीज बिल ई-मेल, तसेच एसएमएसद्वारे दरमहा मिळणार असल्याने ते लगेचच प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाइनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रॉम्ट पेमेंटसह वीज बिल भरल्यास प्रॉम्ट पेमेंटचीही सूट मिळणार आहे.

ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय आहे. सोबतच महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर वीज बिल मूळ स्वरूपात उपलब्ध असून, ते डाऊनलोड किंवा प्रिंट करता येते. महावितरण चंद्रपूर परिमंडळातील २ हजार २६५ ग्राहकांनी वीज बिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्यावरणपूरक पर्याय निवडून पर्यावरणपूरक कामात योगदान दिले आहे.

हा पर्याय सर्वच ग्राहकांना उपलब्ध असून, गो ग्रीनच्या माध्यमातून प्रति वीज बिल १० रुपये वाचविण्यासोबतच कागदाचा वापर टाळून वसुंधरेच्या व पर्यावरणाच्या समृद्धीसाठी हातभार लावण्याचे महत्त्वाचे कार्य साधण्याची संधी आहे.

कोट

‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडण्यासाठी वीज ग्राहकांनी बिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या लिंकवर उपलब्ध आहे. ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा लाभ घ्यावा व पर्यावरणपूरक योजनेमध्ये योगदान द्यावे.

-सुनील देशपांडे, मुख्य अभियंता महावितरण, चंद्रपूर परिमंडळ