कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांसाठी 15 पालक अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 22:48 IST2021-07-18T22:47:45+5:302021-07-18T22:48:37+5:30

जिल्ह्यात  कोरोनामुळे  १ हजार ५३३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये  ३२५ च्या वर बालकांनी आई-वडील यापैकी एकाला गमावले आहे.  बालकांच्या आईवडिलांच्या नावाने असलेल्या संपत्तीकडे दुसऱ्यांचे लक्ष जाण्याची तसेच शासनाच्या योजनांद्वारे मिळणाऱ्या लाभापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन केली असून या समितीवर लक्ष ठेवण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

15 parent officers for children orphaned by Corona | कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांसाठी 15 पालक अधिकारी

कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांसाठी 15 पालक अधिकारी

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाने ३२५ बालकांनी गमावले आई-वडील

साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील ३२५ बालकांनी आई-वडील या दोघांपैकी एक तसेच सात बालकांनी दोन्ही पालकांना गमावले आहे. डोक्यावरील छत्र हरविल्यामुळे या बालकांची वाताहत होऊ नये यासाठी शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात १५ पालक अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. हे पालक अधिकारी बालकांचे संरक्षण, त्यांचे अधिकार आणि न्याय मिळवून देणार आहे.
जिल्ह्यात  कोरोनामुळे  १ हजार ५३३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये  ३२५ च्या वर बालकांनी आई-वडील यापैकी एकाला गमावले आहे.  बालकांच्या आईवडिलांच्या नावाने असलेल्या संपत्तीकडे दुसऱ्यांचे लक्ष जाण्याची तसेच शासनाच्या योजनांद्वारे मिळणाऱ्या लाभापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे. यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन केली असून या समितीवर लक्ष ठेवण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. हे अधिकारी  बालकांची जबाबदारी घेणार आहे.

जबाबदाऱ्यांची केली विभागणी
बालकांना अडचण येऊ नये यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन करून प्रत्येक सदस्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार पेन्शन, आधारकार्ड, जन्माचा दाखवा, जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, मालमत्ता, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनांची मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदारांना कामे करावी लागणार आहे. तर एलआयसीसह इतर पाॅलिसी, बँक खाते, बाल संगोपन आदी कामे बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना करून द्यावी लागणार आहे.  घरकुलाबाबत गटविकास अधिकारी, कौशल्य विकासासाठी तंत्र शिक्षण अधिकारी, अनाथ बालकांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी शिक्षण    विभागाकडे सोपविण्यात आली आहे.

 

Web Title: 15 parent officers for children orphaned by Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.