शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

१३ हजार ५५१ पाणी नमुने अद्याप तपासणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 5:00 AM

जिल्ह्यात २०१९-२० मान्सूनकरिता १४ हजार ९७१ पाणी नमुने तपासणीचे उद्दिष्ट होते. यापैकी प्राप्त झालेल्या १३ हजार २०६ नमुन्यांची तपासणी झाली. २००२०-२१ मान्सूनपूर्व १४ हजार ९७१ नमुन्यांचे उद्दिष्ट मिळाले होते. लॉकडाऊनच्या काळातही १३ हजार ५५१ नमुने प्राप्त करण्यात चंद्रपूर भूजल सर्वेक्षण विभागाला यश आले. मात्र, या नमुन्यांचे विश्लेषण झाले नाही. ३० जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा जोमाने कार्यरत आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊन इफेक्ट : पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका

राजेश मंडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : आदिवासी व ग्रामीण भागात पावसाळ्यात जलजन्य आजार उद्भवू नये, याकरिता राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत दरवर्षी मे महिन्यात विभागनिहाय पाण्याचे नमुने तपासण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र, यंदा कोरोना लॉकडाऊनमुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला जिल्ह्यातील १३ हजार ५५१ पाण्याच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यास अडसर निर्माण झाला. परिणामी, निष्कर्ष अहवालाअभावी ग्रामपंचायतींना जलजन्य आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.जिल्ह्यात २०१९-२० मान्सूनकरिता १४ हजार ९७१ पाणी नमुने तपासणीचे उद्दिष्ट होते. यापैकी प्राप्त झालेल्या १३ हजार २०६ नमुन्यांची तपासणी झाली. २००२०-२१ मान्सूनपूर्व १४ हजार ९७१ नमुन्यांचे उद्दिष्ट मिळाले होते. लॉकडाऊनच्या काळातही १३ हजार ५५१ नमुने प्राप्त करण्यात चंद्रपूर भूजल सर्वेक्षण विभागाला यश आले. मात्र, या नमुन्यांचे विश्लेषण झाले नाही. ३० जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा जोमाने कार्यरत आहेत. राज्यातील पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागात दरवर्षी एकूण सार्वजनिक जलस्रोत, पाण्याचे नमुने आणि नमुने तपासणीचे उद्दिष्ट निश्चित होते. त्यासाठी राज्याचा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा सर्व जिल्ह्यातील पाणी तपासणी प्रयोग शाळांकडे जबाबदारी सोपवितो. सर्वेक्षणानुसार राज्यातील सहा विभागात २ लाख १२ हजार ६१४ सार्वजनिक जलस्रोतांची नोंद केली. यातील १ लाख ५० हजार १६ पाणी नमुन्यांची तपासणी झाली नाही. त्यामुळे भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे राज्य संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी सर्व जि. प. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांसाठी आदेश निर्गमित केले.नागपूर विभागात ३७ हजार नमुनेनागपूर विभागात ७१ हजार ७३ जलस्रोत असून ३६ हजार ५६६ पाण्याचे नमुने मे २०२० पर्यंत तपासणीचे नियोजन भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केले होते. त्यातील ३० हजार ४०० नमुने तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र, लॉकडाऊन लागू झाल्याने ३७ हजार ७२ नमुन्यांची अद्याप तपासणीच होऊ शकली नाही. पाण्याचे नमुने तपासण्यात मागे पडलेल्या औरंगाबाद विभागानंतर नागपूर विभागाचा दुसरा क्रमांक आहे.का केली जाते पाण्याची तपासणी?भूजलक्षेत्रात काम करणारे नियोजक, धोरण आखणाऱ्या निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था व भूजल क्षेत्रात संशोधन व विकास साधणाºया यंत्रणांना पाण्याबाबत सर्वकष माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. अन्यथा भूजल विकासाशी निगडीत समस्यांना तोंड द्यावे लागते. पाणी नमुने तपासल्यानंतर ग्रामपंचायतस्तरावर उपाययोजना करण्यासाठी अहवाल उपयुक्त ठरतो. मात्र, कोरोनाचा कहर सुरू असल्याने नागपूर विभागात यंदा नमुने तपासणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही.जलस्रोतांच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करणे अत्यावश्यक आहे. पावसाळ्यात विविध आजार होऊ नये, याकरिता सदर अहवालावरूनच विविध प्रतिबंधक उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील उर्वरित गावांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे काम विहित कालावधीतच पूर्ण होईल.-राहुल कर्डिले,मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर

टॅग्स :Waterपाणी