शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबाच्या १२.१५ कोटींच्या घोटाळ्यात आता ईडीची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 11:45 IST

Chandrapur : मनी लाँड्रिंगच्या संशयातून तपास

चंद्रपूर :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ताडोबा सफारीच्या बुकिंगसाठी करार केलेल्या वाइल्ड कनेक्टिविटी सोल्युशन्स (डब्ल्यूसीएस) कंपनीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची १२.१५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या विनंतीनुसार ईडीने उडी घेतली असून या मनी लॉड्रिंगच्या संशयातून तपास होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी डब्ल्यूसीएस कंपनीचे संचालक अभिषेक सिंह ठाकूर व रोहित सिंह ठाकूर यांना अटक केली होती. ईडीने यासंदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्याकडून घोटाळ्याच्या संदर्भात माहिती घेण्यात आल्यानंतर विभागातील ऑडिटमधील दस्तऐवज तसेच चंद्रपूर रामनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याचा तपास करणारे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष म्हसके यांच्याकडूनसुद्धा प्रकरणाची कागदपत्र मागितले असल्याची माहिती आहे. डब्ल्यूसीएसच्या कंपनीच्या विरोधात १८ ऑगस्ट २०२३ ला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या विभागीय वनाधिकाऱ्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. दरम्यान, ठाकूर बंधू फरार झाले होते. मात्र, त्यांना पोलिसांनी अटक केली होती.

गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यताआता या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी ईडीला चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ईडीने एंट्री केल्याने तसेच मनी लॉड्रिगची तपासणी सुरू होणार असल्याने हे प्रकरण गंभीर झाले असूनयहोवा राष्ट्रीय कान गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक जितेंद रामगावकर यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. 

 

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयTigerवाघMONEYपैसा