शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

१२ रुग्णांनी जिंकली कोरोना लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत बाहेरून आलेल्या नागरिकांची एकूण संख्या ७१ हजार १३३ आहे. कोविड-१९ संक्रमित रुग्णांची संख्या २२ असून सहा रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले. तसेच १६ रुग्णांना कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. यातील १२ रुग्णांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरोनामुक्त : आता अ‍ॅक्टीव रुग्ण केवळ १०

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आधी चंद्रपूर शहर आणि त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूने शिरकाव केला. सुरुवातीला रुग्णसंख्या झपाट्याने वाढून २२ झाली. त्यानंतर मात्र एकही नवा रुग्ण आढळला नाही. दरम्यान, शुक्रवारी आणखी नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. म्हणजेच २२ पैकी १२ रुग्णांनी कोरोना लढाई जिंकली असून त्यांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. यामुळे घाबरलेल्या जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यामध्ये यापूर्वी २ मे ( एक रूग्ण ), १३ मे ( एक रुग्ण ) १९ व २० मे ( १० रुग्ण ) पॉझिटिव्ह आढळले होते. या एकूण १२ रुग्णांना आत्तापर्यंत जिल्हा प्रशासनाने कोरोना आजारातून बरे झाले असल्याचे जाहीर केले आहे. यातील पहिला रुग्ण नागपूर येथून डिस्चार्ज करण्यात आला होता. तर एका युवतीला दोन दिवसांपूर्वी बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली. आरोग्य विभागाने नव्याने जाहीर केलेल्या आरोग्य सूत्रानुसार १९ व २० मे रोजी पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना १० दिवसानंतर कोणतेही लक्षणे न दिसल्यामुळे या आजारातून बरे झाल्याचे जाहीर करण्यात आले. आता १० रुग्ण जिल्ह्यात वैद्यकीय वास्तव्यात आहे.जिल्ह्यात आतापर्यंत बाहेरून आलेल्या नागरिकांची एकूण संख्या ७१ हजार १३३ आहे. कोविड-१९ संक्रमित रुग्णांची संख्या २२ असून सहा रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले. तसेच १६ रुग्णांना कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. यातील १२ रुग्णांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील एकूण अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या १० झाली आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने चंद्रपूर शहर व शहरातून अन्य ठिकाणी जाणाऱ्यांसाठी शकुंतला लॉनमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आतापर्यंत आढळलेले सर्व कोविड रुग्ण, प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक नागरिक व बाहेरून आलेल्या प्रत्येकाने आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. जिल्ह्यात दहा कंटेनमेंट झोनमध्ये ७१ आरोग्य पथकामार्फत तीन हजार १५१ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.जिल्ह्यात आता दहा कंटेनमेंट झोनजिल्ह्यात ग्रामीण भागात आठ व महानगरपालिका क्षेत्रात तीन असे एकूण ११ कंटेनमेंट झोन कार्यान्वित होते. परंतु बिनबा गेट येथील कंटेनमेंट झोनला १४ दिवस पूर्ण झाल्यामुळे एक कंटेनमेंट झोन कमी करण्यात आले आहे. आता एकूण १० कंटेनमेंट झोन कार्यान्वित आहे. सदर झोनमधील रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी पुन्हा तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आणखी काही कंटेनमेंट झोन शनिवारी कमी होऊ शकतात.संपर्कातील संशयितांचा शोध सुरूकोविड-१९ संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन १४ दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच आयएलआय, सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या