शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

१ हजार १९६ गावे दुष्काळाच्या छायेत

By admin | Updated: December 3, 2015 01:14 IST

सरकारने महिनाभरापूर्वी जाहीर केलेल्या दुष्काळी गावांच्या यादीतून चंद्रपूर जिल्ह्याला वगळले होते.

सुधारित पैसेवारीसाठी प्रशासनाचे पत्र : चिमूर, भद्रावती, जिवती तालुके वगळलेगोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूरसरकारने महिनाभरापूर्वी जाहीर केलेल्या दुष्काळी गावांच्या यादीतून चंद्रपूर जिल्ह्याला वगळले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने १ हजार ८३६ गावांपैकी १ हजार १९६ गावे दुष्काळाच्या छायेत असल्याचा सुधारित अहवाल महसूल व वनविभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविला आहे. त्यामुळे भविष्यात ही गावे दुष्काळग्रस्त यादीत येण्याची आशा बळावली आहे.चंद्रपूर जिल्हा धान, कापूस आणि सोयाबीन उत्पादनाचा जिल्हा म्हणून प्रामुख्याने ओळखला जातो. मात्र यंदा अपुऱ्या पर्जन्यमानामुळे धान पीक पार वाया गेले. कपाशीवरही लाल्या आल्याने या पिकानेही दगा दिला आहे. सोयाबीनचीही उतारी बरीच घटल्याने जिल्ह्यातील शेतकरी यंदा दुष्काळाशी लढत असल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापूर्वी सरकाने जाहीर केलेल्या दुष्काळी गावांच्या यादीतून चंद्रपूर जिल्ह्याला वगळले होते. यामुळे प्रचंड रोष व्यक्त होत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी महसूल यंत्रणेने पाठविलेल्या यादीनुसारचे पैसेवारी जाहीर करण्यात आल्याचे सांगितल्याने जनतेचा प्रशासकीय यंत्रणेवरील रोष वाढला होता. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरिप हंगामातील पिकांची सुधारित पैसेवारी अलीकडेच सरकारला कळविली आहे. त्यात जिल्ह्यातील १ हजार ६८१ खरिप गावांपैकी १ हजार १९६ गावांची सुधारित पैसेवारी ५० पैशाखाली दर्शविली आहे.जिल्ह्यात एकूण १ हजार ८३६ गावे असून खरिपांची गावे एक हजार ६८१ आहेत. तर, १८ गावे पीक नसलेली आहेत. त्यापैकी ४६७ गावांची सुधारित पैसेवारी ५० पैशाहून अधिक दाखविली असून उर्वारित एक हजार १९६ गावांची पैसेवारी ५० पैशाहून कमी दाखविली आहे.