पश्चिम मध्य रेल्वेत मोठी भरती, 2500 हून अधिक जागांसाठी मागवले अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 09:45 AM2022-11-23T09:45:53+5:302022-11-23T09:46:23+5:30

West Central Railway Recruitment 2022 : ही भरती मोहीम एकूण 2521 अप्रेंटिस रिक्त जागा भरण्यासाठी राबविण्यात येत आहे.

West Central Railway Recruitment 2022 Apply For 2521 Apprentice Posts Jobs Sarkari Naukri | पश्चिम मध्य रेल्वेत मोठी भरती, 2500 हून अधिक जागांसाठी मागवले अर्ज 

पश्चिम मध्य रेल्वेत मोठी भरती, 2500 हून अधिक जागांसाठी मागवले अर्ज 

googlenewsNext

नवी दिल्ली : पश्चिम मध्य रेल्वेने (West Central Railway)तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर 17 डिसेंबरपर्यंत रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. ही भरती मोहीम एकूण 2521 अप्रेंटिस रिक्त जागा भरण्यासाठी राबविण्यात येत आहे.

वयोमर्यादा 
पश्चिम मध्य रेल्वेमधील या रिक्त पदांसाठी 17 नोव्हेंबर 2022 रोजी उमेदवारांचे वय 15 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अधिक वयाची सवलत लागू आहे.

शैक्षणिक पात्रता  
अर्जदारांनी संबंधित ट्रेडमध्ये किमान 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि आयटीआय (NCVT/SCVTशी संलग्न) असणे आवश्यक आहे.
 
निवड प्रक्रिया
पश्चिम मध्य रेल्वेच्या अप्रेंटिस भरतीसाठी अर्जदार उमेदवारांनी इयत्ता दहावीमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज शुल्क
पश्चिम मध्य रेल्वेच्या अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. महिला, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in ला भेट द्यावी.
- त्यानंतर होम पेजवर असलेल्या एन्गेजमेंट ऑफ अप्रेंटिस अॅक्टवर क्लिक करा.
- अप्रेंटिस भरतीसाठी अप्लाय लिंकवर क्लिक करा आणि स्वतःचे रजिस्ट्रेशन करा.
- आता तुमचा अर्ज भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
- उमेदवारांनी भविष्यातील संदर्भासाठी एक प्रत डाउनलोड करून प्रिंटआउट घ्यावी.

Web Title: West Central Railway Recruitment 2022 Apply For 2521 Apprentice Posts Jobs Sarkari Naukri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.