परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेला पहिली पसंती; इतर भाषांसह मराठीचा टक्का घसरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:00 IST2025-06-19T14:59:26+5:302025-06-19T15:00:24+5:30

NEET Exam: आता बहुतेक विद्यार्थी इंग्रजी भाषा निवडत आहेत. 

Students first choice for exams is English; Marathis percentage has dropped along with other languages | परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेला पहिली पसंती; इतर भाषांसह मराठीचा टक्का घसरला!

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेला पहिली पसंती; इतर भाषांसह मराठीचा टक्का घसरला!

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तरुणांनी प्रश्नपत्रिकेची भाषा अतिशय काळजीपूर्वक निवडण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी, स्थानिक भाषेत शिकवणाऱ्या नोट्स आणि शिक्षकांमुळे, नीट परीक्षेत हिंदी, गुजराती, मराठी, तेलुगू आणि इतर भाषांमधून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इंग्रजीच्या तुलनेत अधिक होती. मात्र आता बहुतेक विद्यार्थी इंग्रजी भाषा निवडत आहेत. 
   
नीटमध्ये भाषा बदलून बसलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की इंग्रजी भाषेत अनेक विषय समजून घेणे आणि उत्तरे देणे खूप सोपे आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की इंग्रजी भाषेतील अभ्यासाचे विषय इतर भाषांपेक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन सहज उपलब्ध आहेत. 

कोणत्या भाषेचे किती विद्यार्थी 
इंग्रजी- १८,२२,४१०
हिंदी- ३,२८,६३४
आसाम- २,४७८
बंगाल- ३८,२४२
गुजरात- ५३,०२५
मराठ- ९२७
पंजाब- १७० 
तमि- २६,५८०
तेलुगू    - ९०७
उर्दू- ९४३

अशी वाढत गेली संख्या
एनटीएनुसार, २०१९ मध्ये १२,०४,९६८ विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत परीक्षा दिली, तर १,७९,८५७ विद्यार्थी हिंदी भाषेतून परीक्षेत बसले. २०२१ मध्ये  इंग्रजी भाषेतून १२,६५,५२० विद्यार्थी आणि हिंदी भाषेतून २,२८,४४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या वर्षी १८२२ जणांनी उर्दू भाषा निवडली. 

विषय उपलब्ध असेल तर संख्या वाढेल
नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली पसंती इंग्रजी आहे आणि हिंदी दुसऱ्या क्रमांकावर येते. अशा परिस्थितीत, येत्या काही वर्षांत इतर भाषांमधून परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे मत अनेक करिअर तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

Web Title: Students first choice for exams is English; Marathis percentage has dropped along with other languages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.