शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

SGPGI Recruitment 2022: PGI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; टेक्निकल ऑफिसरसह अनेक पदांवर भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 21:02 IST

SGPGI Recruitment 2022: संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी sgpgims.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. 

SGPGI Recruitment 2022: संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (SGPGI) मेडिकल आणि नॉन मेडिकल पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. या माध्यमातून मेडिकल फिजिसिस्ट, मेडिकल सोशल सर्व्हीस ऑफिसर आणि पर्सनल असिस्टंटसारख्या विविध पदांवर भरती केली जाणार आहे. एकूण १६५ रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारीनोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी आहे. इच्छुकांना अर्ज दाखल करण्यासाठी SGIPGI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म भरावा लागणार आहे. या पदांसाठीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २५ जानेवारी २०२२ पासून सुरू झाली आहे. 

एसजीपीजीआयमध्ये (Sanjay Gandhi Post Graduate Institute of Medical Science SPPGI) विविध पदांसाठी भरतीसाठी जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार अर्ज ऑनलाइन मोडनं नियोजित करण्यात आले आहेत. ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना १४ फेब्रुवारी २०२२ पर्यंतचा कालावधी दिला आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याआधी वेबसाइटवर उपलब्ध नोटिफिकेशनची व्यवस्थित माहिती करुन घ्यावी. यासोबतच अर्जात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. नाहीतर अर्ज नाकारला जाऊ शकतो. 

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया१. अर्ज करण्यासाठी सर्वात आधी SGPGI च्या अधिकृत वेबसाइटवर sgpgims.org.in वर भेट द्या. 

२. वेबसाइटच्या होमपेजवर उपलब्ध असलेल्या Recruitments/Admissions टॅबवर क्लिक करा

3. आता Apply Online: Application form submission against advertisement nos या लिंकवर क्लिक करा

४. रजिस्ट्रेशनसाठी मोबाइल क्रमांक किंवा इमेलचा वापर करावा. 

५. प्राप्त झालेल्या पासवर्डच्या माध्यमातून लॉगइन करा

६. अर्जाचं शुल्क भरा

७. अखेरीस अर्जाची प्रत डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआऊट काढून ठेवा. 

वॅकेन्सी डिटेल्सSGPGI च्या नोटिफिकेशननुसार एकूण १६५ पदांसाठी भरती जारी केली आहे. यात मेडिकल फिजिसिस्टसाठी ३ जागा, ट्यूटर कॉलेज ऑफ नर्सिंगसाठी ८ जागा, टेक्लिकल ऑफिसरसाठी ३ जागा, मेडिकल सोशल सर्व्हिस ऑफिसरसाठी ११ जागा, असिस्टंट डाएटिशिअनसाठी ६ जागा, फिजिओथेरेपिस्टसाठी ११ जागा, फार्मासिस्ट ग्रेड-३ साठी १४ जागा, हाऊसकिपिंगसाठी ३ जागांवर भरती केली जाणार आहे. 

यासोबतच रिसेप्शनिस्टसाठी १८ जागा, ज्युनिअर इंजिनिअर सिवील विभागासाठी ९ जागा आणि ज्युनिअर इंजिनिअर इलेक्ट्रिकलसाठी ४ जागांवर भरती केली जाणार आहे. ज्युनिअर इंजिनिअर मॅकेनिक विभागासाठी दोन जागा आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रूप-सीमध्ये १४ जागा भरल्या जाणार आहेत. तसेच पर्सनल असिस्टंटसाठी १० जागा, स्टेनोग्राफरसाठी २२ जागा आणि ड्रायव्हरसाठी १० जागांवर भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रियेसाठीची संपूर्ण माहिती वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. 

टॅग्स :jobनोकरीFarmerशेतकरीGovernmentसरकारCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन