SBI: सुरक्षित आणि भरघोस पगाराची नोकरी; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, लगेच करा अर्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:49 IST2026-02-25T15:34:14+5:302026-02-25T15:49:00+5:30

SBI Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

SBI Recruitment 2026: Golden Opportunity for Specialist Officers; Apply for 116 Vacancies with Package up to 50 Lakh | SBI: सुरक्षित आणि भरघोस पगाराची नोकरी; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, लगेच करा अर्ज!

SBI: सुरक्षित आणि भरघोस पगाराची नोकरी; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, लगेच करा अर्ज!

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक ५० लाख रुपयांपर्यंत आकर्षक वेतन मिळण्याची संधी आहे. 

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण विविध पदांवर नियुक्ती केली जाणार आहे, यात असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट- १२ पदे, डेप्युटी मॅनेजर-४३ पदे आणि  डेप्युटी मॅनेजरच्या ६१ पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली. इच्छुक उमेदवारांनी १५ मार्च २०२६ पर्यंत आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. या तारखेनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

तांत्रिक पदे: उमेदवाराकडे संबंधित विषयात B.E./B.Tech पदवी किंवा संगणक विज्ञानात (Computer Science) पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
फायनान्स/क्रेडिट पदे: सीए (CA), आयसीडब्ल्यूए (ICWA) किंवा एमबीए (MBA) पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २३ ते २५ वर्षे आणि कमाल वय ३५ ते ४२ वर्षे असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

निवड प्रक्रिया

सर्वात आधी, उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. ज्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा बँकेच्या निकषांनुसार अचूक असेल, त्यांनाच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरवले जाईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेला सामोरे जावे लागेल. लेखी परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्हीमधील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

Web Title : SBI में विशेषज्ञ अधिकारियों की भर्ती: सुरक्षित नौकरी, उच्च वेतन!

Web Summary : एसबीआई ने 50 लाख तक के वेतन के साथ विशेषज्ञ अधिकारी भर्ती की घोषणा की। 15 मार्च, 2026 तक ऑनलाइन आवेदन करें। विभिन्न पद उपलब्ध हैं, जिसके लिए विशिष्ट योग्यता और अनुभव आवश्यक हैं। चयन में स्क्रीनिंग, लिखित परीक्षा और साक्षात्कार शामिल हैं। विवरण के लिए एसबीआई की वेबसाइट पर जाएं।

Web Title : SBI Hiring Specialist Officers: Secure Job, High Salary Awaits!

Web Summary : SBI announces Specialist Officer recruitment with salaries up to ₹50 lakhs. Apply online by March 15, 2026. Various posts available, requiring specific qualifications and experience. Selection involves screening, written exam, and interview. Visit SBI's website for details.