शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

SBI PO Recruitment 2021: एसबीआयमध्ये ऑफिसर पदांसाठी निघाली मोठी भरती; ४२ हजारांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 10:51 AM

SBI PO Recruitment 2021: पाहा नोटीफिकेशन आणि जाणून घ्या कसा करू शकाल अर्ज.

ठळक मुद्देपाहा नोटीफिकेशन आणि जाणून घ्या कसा करू शकाल अर्ज.

SBI PO Notification 2021, Sarkari Naukri 2021: स्टेट बँक ऑफ इंडियानं (State bank of india) प्रोबेशनरी ऑफिरसच्या (PO) भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. यासाठी अर्जप्रक्रिया ५ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. तसंच अर्ज करण्याची अखेरची तारीख २५ ऑक्टोबर असेल. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना sbi.co.in या संकेतस्थळावर जाऊन नोटिफिकेशन पाहून अर्ज करता येईल. यामध्ये एकूण प्रोबेशनरी ऑफिसरच्या २०५६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 

SBI PO पदांसाठी प्रिलिम्स परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहेत. या परीक्षांच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील. २०५६ जागांपैकी २०० जागा या EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ऑफिसर पदांवर नोकरी मिळण्यासाठी उमेदवारांना प्रिलिम्स, मेन, इंटरव्ह्यू राऊंड आणि प्री एक्झाम ट्रेनिंगही क्लिअर करावी लागणार आहे. याची संपूर्ण निवड प्रक्रिया नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळेल.

अर्ज करणाऱा उमेदवार पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असणं अनिवार्य आहे. जे उमेदवार पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात किंवा सेमिस्टरमध्ये असतील त्यांना देखील काही अटींचं पालन करून अर्ज करता येणार आहे. जर त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं, तर त्यांना ३१ डिसेंबर २०२१ किंवा त्यापूर्वी परीक्षा दिल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा २१ ते ३० ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूटही देण्यात येणार आहे.

किती असेल वेतन?ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना चार आगाऊ वेतनवाढीसह २७,६२० रूपये बेसिक पे दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांचा पगार २३,७०० ते ४२.०२० रूपये यांदरम्यान असेल. याशिवाय उमेदवारांना DA, HRD, CCA आणि अन्य भत्तेही दिले जातील. ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना निवडीच्या वेळी दोन लाख रूपयांच्या बॉन्डवर सही करावी लागेल. त्यानुसार उमेदवारांना किमान तीन वर्षांसाठी बँकेत नोकरी करावी लागणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

टॅग्स :SBIएसबीआयjobनोकरीState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया