स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 42 वयापर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:08 IST2025-10-28T17:07:54+5:302025-10-28T17:08:16+5:30

SBI SCO : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी संधी आली आहे.

SBI jobs : Golden job opportunity in State Bank of India know more | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 42 वयापर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या माहिती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 42 वयापर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या माहिती

SBI Jobs : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी संधी आली आहे. देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये स्पेशॅलिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

या भरती अंतर्गत एकूण 103 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in वर सुरू आहे.

रिक्त पदांचा तपशील

प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन) - 1 पद

रीजनल हेड (रिटेल) - 4 पदे

रीजनल हेड - 7 पदे

रिलेशनशिप मॅनेजर - टीम लीडर 19 पदे

गुंतवणूक तज्ञ (IS) - 22 पदे

गुंतवणूक अधिकारी (IO) - 46 पदे

प्रकल्प विकास व्यवस्थापक (व्यवसाय) - 2 पदे

केंद्रीय संशोधन टीम (सहाय्यता) - 2 पदे

अर्ज करण्याची प्रक्रिया

उमेदवारांनी प्रथम एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

मेन पेजवर दिलेल्या संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.

नवीन युजर्सनी आधी नोंदणी (Registration) करावी.

त्यानंतर अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज सबमिट करून डाउनलोड करावा.

वयोमर्यादा 

प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन), क्षेत्रीय प्रमुख (रिटेल) आणि क्षेत्रीय प्रमुख पदांसाठी: 35 ते 50 वर्षे

रिलेशनशिप मॅनेजर - टीम लीडर, गुंतवणूक तज्ञ (IS): 28 ते 42 वर्षे

गुंतवणूक अधिकारी (IO): 28 ते 40 वर्षे

प्रकल्प विकास व्यवस्थापक (व्यवसाय): 30 ते 40 वर्षे

केंद्रीय संशोधन टीम (सहाय्यता): 25 ते 35 वर्षे

निवड प्रक्रिया 

एसबीआयच्या माहितीनुसार, उमेदवारांची निवड पुढील टप्प्यांद्वारे केली जाईल:

प्राथमिक शॉर्टलिस्टिंग,

त्यानंतर वैयक्तिक / टेलिफोनिक / व्हिडिओ मुलाखत,

आणि शेवटी CTC (वेतन चर्चा).

अर्ज शुल्क 

सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी - ₹750 

SC/ST/दिव्यांग उमेदवारांना शुल्क माफ.

शुल्काचे पेमेंट डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाइन करावे लागेल.

एकदा भरलेले शुल्क परत न मिळणारे आहे.

 

Web Title : एसबीआई में नौकरी का सुनहरा अवसर: 42 वर्ष तक के लिए आवेदन करें

Web Summary : एसबीआई में स्पेशलिस्ट कैडर ऑफिसर पदों पर भर्ती। 103 पदों के लिए 17 नवंबर, 2025 तक आवेदन करें। प्रबंधक और विशेषज्ञ पद शामिल हैं। साक्षात्कार के माध्यम से चयन। एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उम्मीदवारों को छोड़कर, आवेदन शुल्क लागू।

Web Title : SBI Job Opportunity: Apply by 2025 for Various Specialist Roles

Web Summary : SBI offers specialist cadre officer jobs. Apply by November 17, 2025, for 103 positions. Roles include managers and specialists. Selection via interview. Application fees apply except for SC/ST/PWD candidates.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.