शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या गुणांच्या आधारावर रेल्वेत मिळणार नोकरी, तरुणांसाठी सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 12:22 IST

ज्यासाठी इच्छुक उमेदवार 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या नोकरीबद्दल तपशीलवार जाणून घेऊया..

रेल्वेत नोकरी शोधत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. आपल्याला परीक्षेविनाच रेल्वेमध्ये नोकरी मिळू शकणार आहे, ही कोरोना काळातील सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूरने ट्रेड अप्रेंटिससाठी बंपर रिक्त जागांवर भरती काढल्या आहेत. ज्यासाठी इच्छुक उमेदवार 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या नोकरीबद्दल तपशीलवार जाणून घेऊया..परीक्षा न घेता निवडले जाणाररेल्वेत 432 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. ज्यामध्ये दहावीच्या गुणांच्या आधारावर नोकरी मिळणार आहे. या पदांवर भरती आयटीआय कोर्सच्या गुणांवर आणि दहावीच्या गुणांवर आधारित असेल. दहावी आणि आयटीआयच्या उमेदवारांच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर या नोकरीत उमेदवारांची निवड केली जाणार आहे.30 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज कराया भरतींसाठी उमेदवारांना 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवार अप्रेंटिसशिप इंडिया डॉट कॉमच्या माध्यमातून या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतींमध्ये 164 पदे अनारक्षित आहेत. तर 44 ईडब्ल्यूएस, 120 ओबीसी, 69 एससी, 35 एसटी प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. या भरती विविध ट्रेडसाठी होणार आहेत. अप्रेंटिसच्या भरती आहेत म्हणून त्यांची कोणतीही परीक्षा होणार नाही.पात्रता आणि वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांकडे पदा संबंधित ट्रेडमध्ये दहावी मार्कशीट व आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक आहे. उमेदवाराचे कमाल वय 24 वर्षे असावे. वय 01.07.20पर्यंत ग्राह्य धरलं जाईल. ओबीसी प्रवर्गासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा तीन वर्षे, अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी पाच वर्षे आणि वेगळ्या-अपंग व्यक्तींसाठी दहा वर्षे सवलत देण्यात आली आहे. या पदांसाठी तपशीलवार जाणून घेण्यासाठी उमेदवारांना सूचना अवश्य पाहा. निवड झालेल्या उमेदवारांचे एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले जाईल. छत्तीसगड सरकारच्या नियमांनुसार त्यांना एक वेतन मिळणार आहे.  

टॅग्स :railwayरेल्वे