BSF मध्ये 500 हून अधिक पदांसाठी भरती, 10वी पास उमेदवार करू शकतात अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 18:30 IST2025-12-28T18:29:47+5:302025-12-28T18:30:08+5:30
BSF Recruitment : जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

BSF मध्ये 500 हून अधिक पदांसाठी भरती, 10वी पास उमेदवार करू शकतात अर्ज
BSF Recruitment : सीमासुरक्षा दलात (BSF) नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. BSF मध्ये कॉन्स्टेबल (GD) पदांसाठी स्पोर्ट्स कोट्यातून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2026 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण किती पदे?
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 549 कॉन्स्टेबल (GD) पदे भरली जाणार आहेत.
पात्रता निकष
उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण किंवा त्यास समकक्ष पात्रता असलेला असावा.
उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 23 वर्षे असावे.
ही भरती स्पोर्ट्स कोटा अंतर्गत असल्याने संबंधित क्रीडा पात्रतेची अट लागू राहील.
सविस्तर माहितीकरिता उमेदवारांनी अधिकृत BSF संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज कसा करावा?
उमेदवार खालील टप्प्यांद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात -
सर्वप्रथम BSF च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
होमपेजवरील संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.
नवीन विंडो उघडल्यानंतर प्रथम नोंदणी पूर्ण करा.
नंतर अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि सबमिट करा.
शेवटी आपला फॉर्म डाउनलोड करून त्याचा प्रिंटआउट जवळ ठेवा.
उमेदवारांसाठी सूचना
भरती प्रक्रियेशी संबंधित नवीन अपडेट्स, सूचना व बदलांसाठी अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे लक्ष ठेवण्याचा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे.