rbi security guard recruitment 2021 reserve bank of india security guard vacancy 10th pass apply opportunities rbi ibpsonline | दहावी उत्तीर्ण उमेदवारांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; वाचा अधिक माहिती

दहावी उत्तीर्ण उमेदवारांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; वाचा अधिक माहिती

ठळक मुद्देमुंबईत सर्वाधिक जागादहावीपेक्षा अधिक शिक्षण असलेल्या उमेदवारांचा अर्ज करता येणार नाही

Reserve Bank of India Recruitment 2021 : १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पुन्हा एकदा एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल २४१ जागांसाठी भरती केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेत सिक्युरिटी गार्ड या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. www.rbi.org.in या वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसंच अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी २०२१ ही आहे. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार असून ती फेब्रुवरी अथवा मार्च महिन्यात घेण्यात येईल. देशातील १८ शहरांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसंच उमेदवारांना १२ फेब्रुवारीपर्यंत यासाठी शुल्क भरावं लागणार आहे. २४१ पैकी ३२ जागा या एससी, ३३ जागा एसटी आणि ४५ जागा ओबीसी वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त ईडब्ल्यूएससाठी १८ जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी ११३ जागा असतील. 

१८ ते २५ या वयोगटातील उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. तसंच ओबीसी वर्गासाठी तीन वर्षांची तर एससी, एसटी वर्गासाठी पाच वर्षांची सूट देण्यात येणार आहे. १० वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसंच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थांना यासाठी अर्ज करता येणार नाही. अर्ज करणारा उमेदवाराचं १ जानेवारी २०२१ पर्यंत पदवीपेक्षा कमी शिक्षण असणं आवश्यक आहे. सर्वप्रथम उमेदवारांची निवड ही ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षेद्वारे केली जाईल. त्यानंतर त्यांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. शारीरिक चाचणी केवळ उत्तीर्ण करावी लागणार आहे. त्याचे गुण मेरिटमध्ये घेतले जाणार नाहीत. अंतिम यादी ही ऑनलाईन लेखी परीक्षेच्या आधारेच तयार केली जाणार आहे. लेखी परीक्षेत, रिजनिंग, जनरल इंग्लिश, न्यूमरिकल एबिलिटीशी निगडीत प्रश्न विचारले जातील. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Web Title: rbi security guard recruitment 2021 reserve bank of india security guard vacancy 10th pass apply opportunities rbi ibpsonline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.