10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:38 IST2025-07-17T17:37:50+5:302025-07-17T17:38:10+5:30
Rajasthan High Court Peon Recruitment 2025: उच्च न्यायालयात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
उच्च न्यायालयात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. राजस्थानउच्च न्यायालयाने शिपाई पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत ५ हजारांहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरती अंतर्गत शिपाई पदाच्या एकूण ५ हजार ६७० जागा भरल्या जाणार आहेत. २७ जून २०२५ पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२५ आहे. महत्त्वाचे म्हणजे, उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवार दहावी उतीर्ण असावा आणि त्याला हिंदीसह राजस्थानी भाषेचे चांगले ज्ञान असावे, अशी अट आहे.
इच्छुक उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२६ रोजी १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवाराला १७ हजार ७०० ते ५६ हजार इतका पगार दिला जाणार आहे. राजस्थान उच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाइट hcraj.nic.in वर या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.