Indian Railways : रेल्वेत मोठी भरती; १० वी, १२ वी उत्तीर्ण अमेदवारांना अर्ज करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 15:18 IST2022-10-04T15:18:19+5:302022-10-04T15:18:46+5:30
Railway Recruitment: रेल्वेने विविध ट्रेडमध्ये अप्रेंटिसच्या 3150 पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

Indian Railways : रेल्वेत मोठी भरती; १० वी, १२ वी उत्तीर्ण अमेदवारांना अर्ज करता येणार
Railway Recruitment: रेल्वे रिक्रूटमेंट सेल, सदर्न रेल्वेने विविध ट्रेडमध्ये अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. 3150 पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. कॅरेज आणि वॅगन वर्कशॉप पेरांबूर, सेंट्रल वर्कशॉप पोनमलाई त्रिची, एस अँड टी वर्कशॉप पोदनूर या तीन युनिट्ससाठी अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. या रिक्त जागा तीन श्रेणींमध्ये असतील. पहिली श्रेणी साधारण 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी, दुसरी श्रेणी साधारण 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आणि तिसरी श्रेणी ITI डिप्लोमा प्रमाणपत्र धारकांसाठी आहे.
फिटर, वेल्डर, सुतार, कारपेंटप, टर्नर, इलेक्ट्रीशियन यासह अनेक पदांसाठी या नियुक्त्या केल्या जातील. अर्ज प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून त्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा आणि मुलाखत होणार नाही. ही भरती 10वी, 12वी आणि ITI कोर्समध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. या गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. इच्छुक उमेदवार sr.indianrailways.gov.in वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या पदांसाठी उमेदवाराचं किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असणे आवश्यक आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्षे, एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी दहा वर्षांची सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.