PNB: पंजाब नॅशनल बँकेत बंपर भरती, पदवीधरांना मोठी संधी, ५ हजारांहून अधिक जागांसाठी अर्ज सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 14:52 IST2026-02-15T14:50:19+5:302026-02-15T14:52:57+5:30

Punjab National Bank Recruitment 2026: तुम्ही पदवीधर आहात आणि बँकेत नोकरी शोधत आहात? तर ही सुवर्णसंधी सोडू नका! पंजाब नॅशनल बँकेने ५१३८ शिकाऊ उमेदवारांच्या पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे.

Punjab National Bank Recruitment 2026: Apply Now for 5138 Apprentice Posts | PNB: पंजाब नॅशनल बँकेत बंपर भरती, पदवीधरांना मोठी संधी, ५ हजारांहून अधिक जागांसाठी अर्ज सुरू

PNB: पंजाब नॅशनल बँकेत बंपर भरती, पदवीधरांना मोठी संधी, ५ हजारांहून अधिक जागांसाठी अर्ज सुरू

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी पंजाब नॅशनल बँक एक मोठी संधी घेऊन आली. पीएनबीने २०२६ सालासाठी ५१३८ शिकाऊ उमेदवारांच्या पदांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. या पदांसाठीची अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली असून, पात्र उमेदवारांना २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. 

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी पूर्ण केलेली असावी. पदवीचा निकाल ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी लागलेला असावा. १ जानेवारी २०२६ रोजी उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. अधिक माहितीसाठी उमेदवार पीएनबीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

अर्ज शुल्क

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील पुरुष उमेदवारांना ९४४ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर, महिला उमेदवारांसाठी ७०८ रुपये आणि एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी श्रेणीतील आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांना २३६ रुपये अर्ज शुल्क द्यावे लागेल.

अर्ज करण्याची पद्धत

- पीएनबीच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- होमपेजवरील भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
- प्रथम स्वतःची नोंदणी पूर्ण करा.
- सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहितीसह अर्ज भरा.
- ऑनलाइन शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.

Web Title : PNB भर्ती 2026: स्नातकों के लिए सुनहरा अवसर, 5000+ पदों के लिए आवेदन करें

Web Summary : पंजाब नेशनल बैंक ने 2026 के लिए 5138 अपरेंटिस पदों पर भर्ती की घोषणा की है। स्नातक 24 फरवरी, 2026 तक ऑनलाइन आवेदन कर सकते हैं। आवेदन शुल्क श्रेणी के अनुसार अलग-अलग है। विवरण और पंजीकरण के लिए पीएनबी की वेबसाइट पर जाएं।

Web Title : PNB Recruitment 2026: Massive Opportunity for Graduates, Apply for 5000+ Posts

Web Summary : Punjab National Bank announces recruitment for 5138 apprentice posts for 2026. Graduates can apply online until February 24, 2026. Application fees vary by category. Visit PNB's website for details and registration.