Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 17:20 IST2025-05-13T17:18:36+5:302025-05-13T17:20:30+5:30
Indian Army Recruitment: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २८ मे २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
भारतीय लष्करात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. इंडियन मिलिटरी अकादमी जानेवारी २०२६ मध्ये १४२ वा टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स सुरू करणार आहे. या अभ्यासक्रमाद्वारे शॉर्टलिस्टेड अभियांत्रिकी पदवीधरांना भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नोकरी मिळेल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २८ मे २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरती अंतर्गत एकूण ३० जागा भरल्या जाणार आहेत, ज्यात सिव्हिल इंजिनिअरिं- ८ जागा, संगणक विज्ञान/आयटी- ६ जागा, इलेक्ट्रॉनिक्स- ६ जागा, मेकॅनिकल- ६ जागा, इलेक्ट्रिकल- २ जागा आणि इतर २ जागांचा समावेश आहे.
कोण करू शकते अर्ज?
- भारतीय नागरिक किंवा नेपाळी नागरिक किंवा भारतीय वंशाचे लोक जे विशिष्ट देशांमधून भारतात कायमचे स्थायिक होण्यासाठी स्थलांतरित झाले आहेत.
- उमेदवार बी.ई./बी.टेक पदवीधर किंवा अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात आहे.
- उमेदवाराचे वय २० ते २७ दरम्यान आहे आणि तो अविवाहित आहे.
निवड प्रक्रिया
शैक्षणिक गुणवत्तेनुसार आणि अभियांत्रिकी शाखेनुसार कटऑफ टक्केवारी निश्चित केली जाते. त्यानंतर उमेदवाराची मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल. या सर्व कामगिरीच्या आधारावर उमेदवाराची निवड केली जाईल. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in वर भेट द्यावी.