YouTube Shorts च्या माध्यमातून दर महिना ७.५ लाख कमवण्याची संधी; फक्त ‘हे’ काम करा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 06:08 PM2022-01-26T18:08:16+5:302022-01-26T18:09:10+5:30

YouTube Shorts क्रिएटर्स यात विविध माध्यमातून पैसे कमवू शकतात. पुढील काळात यात आणखी फिचर येणार आहेत.

Opportunity to earn Rs 7.5 lakh per month through YouTube Shorts; Just do this | YouTube Shorts च्या माध्यमातून दर महिना ७.५ लाख कमवण्याची संधी; फक्त ‘हे’ काम करा

YouTube Shorts च्या माध्यमातून दर महिना ७.५ लाख कमवण्याची संधी; फक्त ‘हे’ काम करा

googlenewsNext

सध्या सोशल मीडियाच्या जगात अनेकजण स्मार्ट फोनचा वापर करत घरबसल्या चांगली कमाई करत आहेत. फेसबुक, इन्स्टासोबतच आता यू ट्युबच्या माध्यमातूनही पैसे कमवण्यासाठी संधी कंपनीने दिली आहे. २०२० च्या सप्टेंबर महिन्यात YouTube Shorts फिचर लॉन्च करण्यात आला होता. गेल्या २ वर्षात कंपनीनं या फिचरच्या मदतीनं ५ ट्रिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे.

YouTube Shorts क्रिएटर्स यात विविध माध्यमातून पैसे कमवू शकतात. पुढील काळात यात आणखी फिचर येणार आहेत. यूट्युब शॉर्ट्स फंड म्हणून कंपनीने १० कोटी डॉलर म्हणजे जवळपास ७४८.७१ कोटी फंड २०२१-२२ साठी जोडला आहे. कुणीही या फंडचा भाग बनून पैसे कमवू शकतात. त्यासाठी केवळ यूनिक शॉर्ट्स बनवण्याची कला तुमच्या अंगात हवी. जी YouTube वरील कम्युनिटीला आवडेल. यूट्युबने त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलंय की, ते दर महिन्याला क्रिएटर्सशी संपर्क साधतात. ज्यांच्या कंटेटवर जास्त व्ह्यूज आणि एगेंजमेंट असते. शॉर्ट फंड केवळ YouTube Partner Program साठी मिळत नाही तर प्रत्येक क्रिएटरला  जो कंपनीची गाइडलाइन फॉलो करत Shorts बनवतो तो पैसे कमावू शकतो.

YouTube Shorts च्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला कंपनीची गाइडलाइन फॉलो करावी लागेल. जर तुमचं वय १३ ते १८ वय असेल तर त्यासाठी तुम्हाला पॅरेंट एक्सेप्ट टर्म असायला हवं. त्याशिवाय पेमेंटसाठी AdSense Account सेटअप करावं लागेल. सोबतच मागील १८० दिवसांत क्रिएटरने कमीत कमी एक एलिजिबल Shorts अपलोड केलेला असावा.

YouTube CEO Susan Wojcick यांनी मंगळवारी YouTube Shorts वर ५ ट्रिलियन व्ह्यूज झाल्याची माहिती दिली. मागील वर्षी YouTube Shorts क्रिएटर्सला चालना देण्यासाठी कंपनीने १० कोटी डॉलर फंड दिला आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये सर्वात चांगला परफॉर्म करणाऱ्या YouTube Shorts क्रिएटरला १० हजार डॉलर म्हणजे ७ लाख ४८ हजार रुपयांपर्यंत दर महिन्याला पैसे दिलेत. ४० टक्क्यांहून अधिक क्रिएटर्सला यामाध्यमातून पैसे मिळत आहेत. हा एक लॉन्ग रनिंग मोनेटाइजेशन मॉडेल आहे ज्यात क्रिएटर्सला नवा बेस तयार करण्यात येत आहे. कंपनी लाइव्ह शॉपिंग, ब्रॅन्ड कनेक्टसारख्या फिचर्सवर काम करत आहे.

Web Title: Opportunity to earn Rs 7.5 lakh per month through YouTube Shorts; Just do this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.