Google मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी, फक्त १ अट आहे...; जाणून घ्या कसं करायचा अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 09:51 IST2025-02-27T09:51:08+5:302025-02-27T09:51:33+5:30

इंटर्नशिपसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त अर्ज आल्यास गुगल याआधीही ही भरती बंद करू शकते

Opportunity for PhD students to join google Software Engineering Internship program for Summer 2025 | Google मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी, फक्त १ अट आहे...; जाणून घ्या कसं करायचा अर्ज?

Google मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी, फक्त १ अट आहे...; जाणून घ्या कसं करायचा अर्ज?

Google Internship: अमेरिकेत कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर इंटर्नशिप करण्याची संधी आली आहे. गुगल समर २०२५ साठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्नशिप भरती होत आहे. ही इंटर्नशिप अमेरिकेत कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेणाऱ्या PHd विद्यार्थ्यांना फायदेशीर आहे. Google च्या अधिकृत वेबसाईटनुसार इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी २८ मार्च २०२५ ही अखेरची मुदत देण्यात आली आहे.

इंटर्नशिपसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त अर्ज आल्यास गुगल याआधीही ही भरती बंद करू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यासाठी लवकर अर्ज करावा लागणार आहे.  इंटर्नशिप काळात संबंधितांना अमेरिकेत राहावे लागेल त्यामुळे त्या देशात राहणाऱ्या पीएचडी धारकांना याचा लाभ घेता येईल. 

अर्ज कसा करायचा?

इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना गुगलच्या करियर पेजवर जावं लागेल. त्यानंतर तिथे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्न PhD समर २०२५ टॅबवर क्लिक करावे. तिथे Apply वर जाऊन तुमचा अर्ज भरावा. याठिकाणी तुम्हाला अपडेटेड Resume इंग्रजीत अपलोड करावा लागेल. अपडेटेड CV आणि एज्युकेशन सेक्शनमध्ये अनऑफिशियल किंवा ऑफिशियल ट्रान्सक्रिप्ट अपलोड करावी. ट्रान्सक्रिप्ट अपलोड करण्यासाठी डिग्री स्टेटसमध्ये नाऊ अटेंडिंग पर्याय निवडावा. 

पात्रता काय आहे?

इंटर्नशिपसाठी अर्ज करायला उमेदवारांना काही शैक्षणिक अटींची पूर्तता करावी लागेल. उमेदवार हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अथवा अन्य टेक्निकल क्षेत्रात PhD करत असायला हवेत. C/C++, Java अथवा Python सारख्या कुठल्याही एक किंवा एकापेक्षा अधिक भाषेत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कोडिंगचा अनुभव असणे गरजेचे आहे. त्याशिवाय उमेदवाराला डेटा स्ट्रक्चरची माहिती हवी. 

इंटर्नशिपचा कालावधी काय, किती पैसे मिळणार?

गुगल इंटर्नशिपचा कालावधी १२ ते १४ आठवडे चालेल, त्या कालावधीत किती पैसे मिळतील याची माहिती अद्याप दिली नाही. मात्र याठिकाणी त्या पदासाठी फुल टाईम जॉब करणाऱ्यांना ९४ लाख रूपयांपासून १.२६ कोटी पगार दिला जातो. इंटर्नशिपमुळे तुमचा प्रोफेशनली अनुभव तयार होतो. सॉफ्टवेअर इंजिनिअर इंटर्नशिप करताना गुगलच्या प्रोजेक्टवर काम करायला मिळेल. 

Web Title: Opportunity for PhD students to join google Software Engineering Internship program for Summer 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल