NIC Recruitment 2026: एनआयसीमध्ये 'सायंटिस्ट-बी' पदांसाठी मोठी भरती; १.७७ लाखांपर्यंत पगार, कोण करू शकतं अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 19:40 IST2026-04-01T19:39:25+5:302026-04-01T19:40:10+5:30

NIC Announces 243 Vacancies for Scientist B Posts: भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर म्हणजेच एनआयसीने 'सायंटिस्ट-बी' पदांसाठी भरती जाहीर केली.

NIC Recruitment 2026: National Informatics Center  Scientist B Recruitment 2026: Apply for 243 Posts Based on GATE Score | NIC Recruitment 2026: एनआयसीमध्ये 'सायंटिस्ट-बी' पदांसाठी मोठी भरती; १.७७ लाखांपर्यंत पगार, कोण करू शकतं अर्ज?

NIC Recruitment 2026: एनआयसीमध्ये 'सायंटिस्ट-बी' पदांसाठी मोठी भरती; १.७७ लाखांपर्यंत पगार, कोण करू शकतं अर्ज?

 या प्रक्रियेद्वारे एकूण २४३ रिक्त पदे भरली जाणार असून, विशेष म्हणजे यासाठी उमेदवारांची निवड ही त्यांच्या गेट (ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग) स्कोअरच्या आधारे केली जाणार आहे. या भरतीसाठी २७ मार्च २०२६ पासून सुरुवात झाली असून २४ एप्रिल २०२६ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर कुठल्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

या भरती अंतर्गत कंम्युटर सायंस आणि आयटी विभागात एकूण १६८ जागा भरल्या जाणार आहेत. तर, डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी एकूण ५० पदे भरली जाणार आहेत. तर, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या पदावर २५ जणांची निवड केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एनआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

पात्रता आणि निवड प्रक्रिया

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे गेट २०२४, २०२५ किंवा २०२६ पैकी कोणत्याही एका वर्षाचा वैध स्कोअर असणे अनिवार्य आहे. पात्र गेट पेपर्समध्ये संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, तसेच डेटा सायन्स यांचा समावेश आहे. उमेदवारांच्या गेट स्कोअरच्या आधारे त्यांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल आणि त्यानंतर त्यांना कागदपत्र पडताळणी व वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

पगार आणि सोयीसुविधा

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती 'ग्रुप-ए' गॅझेटेड श्रेणीत केली जाईल. ७ व्या वेतन आयोगानुसार, त्यांना लेव्हल-१० (५६,१०० ते १,७७,५०० रुपये) या वेतनश्रेणीनुसार पगार मिळेल. याशिवाय केंद्र सरकारचे इतर भत्ते आणि सेवाही लागू असतील. इच्छुक उमेदवारांनी २४ एप्रिलपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि ई-गव्हर्नन्स प्रकल्पांमध्ये काम करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

Web Title : एनआयसी भर्ती 2026: साइंटिस्ट-बी पदों के लिए आवेदन करें, वेतन ₹1.77 लाख तक

Web Summary : एनआयसी गेट स्कोर के माध्यम से साइंटिस्ट-बी पदों पर भर्ती करता है। कंप्यूटर विज्ञान, आईटी, डेटा विज्ञान और इलेक्ट्रॉनिक्स में 243 रिक्तियां हैं। लेवल-10 वेतन और केंद्र सरकार के लाभों के लिए 24 अप्रैल, 2026 से पहले आवेदन करें।

Web Title : NIC Recruitment 2026: Apply for Scientist-B posts, salary up to ₹1.77 Lakh

Web Summary : NIC recruits Scientist-B positions through GATE scores. 243 vacancies across Computer Science, IT, Data Science, and Electronics. Apply before April 24, 2026, for a Level-10 salary and central government benefits.