NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 19:17 IST2025-10-01T19:13:08+5:302025-10-01T19:17:23+5:30
NHIDCL Recruitment 2025: नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने उपव्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली.

NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
NHIDCL Recruitment 2025: नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने उपव्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी ही थेट सरकारीनोकरी मिळवण्याची मोठी संधी असून, गेट स्कोअरच्या आधारावर ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
एनएचआयडीसीएलने एकूण ३४ रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ४ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे. पात्र सिव्हिल इंजिनिअरिंग उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी ३ नोव्हेंबर २०२५ पूर्वी एनएचआयडीसीएलच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
तपशील | माहिती |
पदाचे नाव | उपव्यवस्थापक |
रिक्त जागा | ३४ |
शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी |
आवश्यक अट | GATE (Civil) परीक्षा २०२३, २०२४ किंवा २०२५ मधील वैध स्कोर |
वेतनश्रेणी | ₹५०,००० ते ₹१,६०,००० (अधिक भत्ते) |
अर्ज करण्याची मुदत | ४ ऑक्टोबर २०२५ ते ३ नोव्हेंबर २०२५ |
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही स्वतंत्र लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. निवड पूर्णपणे त्यांच्या गेट गुणांवर आधारित असेल. जर दोन उमेदवारांचे गेट गुण समान असतील, तर जन्मतारखेनुसार ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य मिळेल. जन्मतारीखही समान असल्यास, दहावीच्या प्रमाणपत्रातील नावाच्या वर्णक्रमानुसार निवड केली जाईल.
जबाबदारी
उपव्यवस्थापक म्हणून निवड होणारे उमेदवार राष्ट्रीय महामार्ग, बोगदे, रणनीतिक रस्ते आणि इतर मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नियोजन, डिझाइन आणि अंमलबजावणी व पर्यवेक्षणाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळतील. सरकारी धोरणे आणि मानकांचे पालन करणे देखील त्यांच्यासाठी बंधनकारक असेल.