MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:54 IST2025-08-04T17:53:58+5:302025-08-04T17:54:30+5:30

MSRTC Recruitment 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

MSRTC Recruitment for trainee posts in Maharashtra State Road Transport Corporation | MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!

MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती नाशिक विभागीय कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आली.  या भरतीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. 

या भरती अंतर्गत एकूण ३६७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, ज्यात अभियांत्रिकी पदवीधर, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनिंग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रीक), पेन्टर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर आणि कारपेंटर यांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ११ ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांचे वय १४ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढीलप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या निवडीसाठी अर्जाचा नमुना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात (एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक) येथे उपलब्ध आहे. हा अर्ज नमुना भरून कार्यालयात सादर करायचा आहे.

Web Title: MSRTC Recruitment for trainee posts in Maharashtra State Road Transport Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.