Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 17:25 IST2025-05-22T17:24:09+5:302025-05-22T17:25:20+5:30

Sarkari Naukri: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

MPSC Assistant Commissioner Notification OUT at mpsc.gov.in, Check Apply Online, Last Date, Eligibility and More | Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!

Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने सहाय्यक आयुक्त पदासाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी २० मे २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ०९ जून २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. 

ही भरती पशुसंवर्धन 'गट अ' पदांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पशुवैद्यकीय विज्ञान पदवी असणे आवश्यक आहे. 

वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा किमान १९ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे असावी. एससी, एसटी उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत ५ वर्षांची आणि ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

१ लाखांहून अधिक पगार
या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार ते १ लाख ९० हजार ८०० रुपये पगार मिळेल. 

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत प्रक्रियेच्या आधारे केली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत
- सर्वात प्रथम, एमपीएससीची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in येथे भेट द्यावी.
- त्यानंतर भरतीच्या ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
-  पुढे फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून अर्ज शुल्क भरा.
- अर्ज दाखल केल्यानंतर त्याची एक प्रिंटआऊट स्वत:जवळ ठेवा. 

या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Web Title: MPSC Assistant Commissioner Notification OUT at mpsc.gov.in, Check Apply Online, Last Date, Eligibility and More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी