Job Alert: संरक्षण मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांवर बंपर भरती; जाणून घ्या कसा कराल अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 17:45 IST2021-07-12T17:44:41+5:302021-07-12T17:45:18+5:30
MOD Recruitment 2021 : इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे

Job Alert: संरक्षण मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांवर बंपर भरती; जाणून घ्या कसा कराल अर्ज
MOD Recruitment 2021 : इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सरकारीनोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. देशाच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विविध विभागांमध्ये नोकर भरतीसाठीचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे यात संरक्षण मंत्रालयाच्या केसी/ओ ५६, एपीओसाठी ४१ फील्ड अॅम्युनेशन डेपोमध्ये एकूण ४५८ पदावर भरती केली जाणार आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या या विविध विभागांमध्ये भरतीसाठीची जाहिरात १० जुलै ते १६ जुलै दरम्यान विविध वृत्तपत्रांमध्येही प्रकाशित करण्यात येत आहे. यात ट्रेड्समॅन मेट आणि एमटीएस सारख्या पदांवर भरती केली जाणार आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करावा लागणार आहे. त्याआधी नोकर भरतीसाठीचे नोटिफिकेशन संपूर्ण वाचून घेणं गरजेचं आहे.
इच्छुक उमेदवारांना indianarmy.nic.in या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. यावर अर्जाचा फॉर्म भरुन तुम्ही नोकरीसाठी आपला अर्ज दाखल करू शकता. अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रांचीही माहिती त्यात देण्यात आली आहे. ही कागदपत्र अर्जदारांना ऑफलाइन पद्धतीनं पोस्टाच्या माध्यमातून पाठवावी लागणार आहेत. इच्छुकांना ३० जुलै २०२१ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज पोस्टानं पाठवताना ते कमांडेंट, ४१ फील्ड अॅम्यूनिशेन डेपो, पिन-९०९७४१ या पत्तावर पाठवावं लागणार आहे. स्पीड पोस्ट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
कोणत्या पदांवर भरती?
१. ट्रेड्समॅन मेट (मजूर)- ३३० जागा, पात्रता- १० वी उत्तीर्ण
२. जेओए (एलडीसी)- २० जागा, पात्रता- १२ वी पास
३. मटेरियल असिस्टंट (एमए)- १९ जागा, पात्रता- पदवीधर किंवा मटेरिअल मॅनेजमेंट विभागात डिप्लोमा
४. एमटीएस- ११ जागा, पात्रता- १० वी उत्तीर्ण
५. फायरमॅन- ६४ जागा, पात्रता- १० वी उत्तीर्ण
६. २५५ (आय), एबीओयू ट्रेड्समॅन मेट (मजूर)- १४ जागा, पात्रता- १० वी उत्तीर्ण
वयाची अट
नोकरीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं वय कमीतकमी १८ वर्ष तर जास्तीत जास्त २५ वर्ष असणं गरजेचं आहे. २५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले उमेदवार अर्ज दाखल करू शकत नाहीत. दरम्यान आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.