12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी नोकरी, डीएसएसएसबीमध्ये २१६ पदांसाठी भरती, संधी सोडू नका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:03 IST2026-02-26T16:02:12+5:302026-02-26T16:03:24+5:30
DSSSB Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी डीएसएसएसबीने मोठी संधी उपलब्ध करून दिली.

12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी नोकरी, डीएसएसएसबीमध्ये २१६ पदांसाठी भरती, संधी सोडू नका!
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी डीएसएसएसबीने मोठी संधी उपलब्ध करून दिली. डीएसएसएसबीने विविध विभागांमधील २१६ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली. यामध्ये असिस्टंट मॅनेजर, रेडिओग्राफर, रिपोर्टर आणि पटवारी यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवार २७ फेब्रुवारीपासून डीएसएसएसबीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकतात. तर, २८ मार्च २०२६ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी डीएसएसएसबीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
निवड प्रक्रिया आणि परीक्षा
संगणक आधारित चाचणी: उमेदवारांच्या विषय ज्ञानाचे आणि अभियोग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाईल.
कौशल्य चाचणी: रिपोर्टर आणि स्टेनोग्राफर यांसारख्या पदांसाठी टायपिंग आणि लघुलेखनाची कौशल्य चाचणी अनिवार्य असेल.
कागदपत्र पडताळणी: लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी केली जाईल.
वैद्यकीय तपासणी: आवश्यकतेनुसार संबंधित विभागाकडून वैद्यकीय चाचणी घेतली जाऊ शकते.
अर्ज शुल्क आणि पगार
अर्ज शुल्क: जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹१०० शुल्क आहे. महिला, एससी, एसटी आणि माजी सैनिकांना नियमानुसार सवलत लागू असेल.
वेतन: निवडलेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार दरमहा ४४ हजार ९०० ते ₹१ लाख ४२ हजार ४०० दरम्यान पगार दिला जाईल.