Indian Railway Jobs: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, या पदांसाठी भरती प्रकिया सुरू, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 09:50 AM2022-04-12T09:50:43+5:302022-04-12T09:51:52+5:30

Indian Railway Jobs: रेल्वेकडून विविध पदांसाठी नियमितपणे भरतीप्रक्रिया सुरू असतात. आता दक्षिण-पश्चिम रेल्वेने मालगाडी मॅनेजरच्या १४७ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

Job Opportunity in Indian Railways, Recruitment Process for these Posts, Eligibility and Conditions | Indian Railway Jobs: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, या पदांसाठी भरती प्रकिया सुरू, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती 

Indian Railway Jobs: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, या पदांसाठी भरती प्रकिया सुरू, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती 

googlenewsNext

मुंबई - भारतील रेल्वे ही रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या सर्वात मोठ्या सार्वजनिक उपक्रमांपैकी एक आहे. त्यामुळे रेल्वेत नोकरीची संधी मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. रेल्वेकडून विविध पदांसाठी नियमितपणे भरतीप्रक्रिया सुरू असतात. आता दक्षिण-पश्चिम रेल्वेने मालगाडी मॅनेजरच्या १४७ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

इच्छुक उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर rrchubli.in च्या माध्यमातून अर्च करू शकता. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही २५ एप्रिल २०२२ ही आहे. मालगाडी मॅनेजरच्या एकूण १४७ पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १ एप्रिलपासून सुरू झाली आहे. कागदपत्रांची छाननी आणि वैद्यकीय चाचणीनंतर परीक्षा घेऊन, उमेदवारांची निवड केली जाईल.

असा दाखल करा अर्ज
- सर्वप्रथण रेल्वेची अधिकृत वेबसाईट असलेल्या rrchubli.in वर जा
- आता होमपेजवर तुम्हाला अधिकृत नोटिफिकेशनजवळ ऑनलाईन अर्जाची लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा
- आता नवीन पेज ओपन होईल
- त्यामध्ये मागण्यात आलेली सर्व माहिती भरा
- आता सर्टिफिकेट आणि सिग्नेचर अपलोड करा
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि मेल आयडीवर नोटिफिकेशन दिसेल
- आता तुम्ही पुढील वापरासाठी अर्जाची प्रिंटही काढून ठेवू शकता.  

Read in English

Web Title: Job Opportunity in Indian Railways, Recruitment Process for these Posts, Eligibility and Conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.