JOB Alert : मस्तच! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; 'या' बँकेत 920 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 03:21 PM2021-08-04T15:21:59+5:302021-09-25T15:18:42+5:30

IDBI Bank Recruitment 2021 : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 असणार आहे. तसेच उमेदवारांचं वय हे 20 ते 25 वर्षांदरम्यान असणं गरजेचं आहे.

JOB Alert IDBI Bank Recruitment 2021 for 920 Executive Posts Apply Online Graduate Eligible | JOB Alert : मस्तच! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; 'या' बँकेत 920 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

JOB Alert : मस्तच! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; 'या' बँकेत 920 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

Next

नवी दिल्ली - बँकेतनोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आता एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. IDBI बँक (Industrial Development Bank of India) मध्ये लवकरच मेगाभरती (IDBI Bank Recruitment 2021) होणार आहे. या भरती अंतर्गत तब्बल 920 जागा नियुक्त केल्या जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 असणार आहे. तसेच उमेदवारांचं वय हे 20 ते 25 वर्षांदरम्यान असणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या तारखा 

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 4 ऑगस्ट 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 ऑगस्ट 2021

जागा 

एकूण जागा - 920

शैक्षणिक पात्रता

- पात्र उमेदवार हे किमान 55% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं आवश्यक आहे.

- SC/ST/PWD उमेदवारांसाठी 50% गुणांसह पदवी आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार यांचं वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

पगार

पहिलं वर्ष - 29,000 रुपये प्रतिमहिना

दुसरं वर्ष -  31,000 रुपये प्रतिमहिना

तिसरं वर्ष - 34,000  रुपये प्रतिमहिना

शुल्क

SC/ST/PWD – रु. 200

इतर उमेदवारांसाठी - रु. 1000

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/08/IDBI-Bank-Recruitment-2021.pdf या वेबसाईटवर जाऊ शकता. तसेच https://ibpsonline.ibps.in/idbirecaug21/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: JOB Alert IDBI Bank Recruitment 2021 for 920 Executive Posts Apply Online Graduate Eligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.