JOB Alert : भारीच! इस्रो LPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 63,200 रुपये पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 02:23 PM2021-08-23T14:23:00+5:302021-08-23T14:28:26+5:30

ISRO LPSC Recruitment 2021: इस्रोच्या लिक्विड प्रोप्युलशन सिस्टीम सेंटरमध्ये (ISRO Liquid Propulsion Systems Centre) विविध पदांवर भरती करण्यात येत आहे.

ISRO LPSC Recruitment 2021: 10th pass candidates can apply for various vacancies; Salary up to Rs 63,200 | JOB Alert : भारीच! इस्रो LPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 63,200 रुपये पगार

JOB Alert : भारीच! इस्रो LPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 63,200 रुपये पगार

Next

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक गुड न्यूज आहे. तरुणांना इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. इस्रोच्या लिक्विड प्रोप्युलशन सिस्टीम सेंटरमध्ये (ISRO Liquid Propulsion Systems Centre) विविध पदांवर भरती करण्यात येत आहे. या विभागात चालक, कुक, फायरमन आणि केटरिंग असिस्टंट पदांवर भरती होणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज दाखल करू शकतात. 24 ऑगस्टपासून अर्ज उपलब्ध होणार असून अर्ज सादर करण्याची मुदत 6 सप्टेंबरपर्यंत आहे.

अर्ज कुठे करायचा?

- पात्र उमेदवार लिक्विड प्रोप्युलशन सिस्टिम सेंटरच्या वेबसाईटवर अर्ज दाखल करू शकतात. 

- या भरतीप्रक्रियेअंतर्गत एकूण 8 जागा भरल्या जाणार आहेत. 

- lpsc.gov.in या वेबसाईटवर 24 ऑगस्टपासून अर्ज दाखल करता येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख - 24 ऑगस्ट 2021

अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 6 सप्टेंबर 2021

जागा

हेवी व्हेहिकल ड्रायव्हर - 2 

लाईट व्हेहिकल ड्रायव्हर - 2  

कुक - 1 

फायरमन - 2  

केटरिंग अटेंडंट - 1 

पात्रता 

या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शिक्षणाची अट दहावी उत्तीर्ण अशी ठेवण्यात आली आहे. 

वयोमर्यादा

फायरमन आणि केटरिंग अटेंडंड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 25 वर्षे तर इतर पदांसाठी वयोमर्यादा 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. 

पगार

हेवी व्हेहिकल ड्रायव्हर - 19,900 ते 63,200 रुपये

लाईट व्हेहिकल ड्रायव्हर - 19,900 ते 63,200 रुपये

कुक - 19,900 ते 63,200 रुपये

फायरमन - 19,900 ते 63,200 रुपये

केटरिंग अटेंडंट - 18,000 ते 56,900 रुपये

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वेबसाईटला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे. 

 

Web Title: ISRO LPSC Recruitment 2021: 10th pass candidates can apply for various vacancies; Salary up to Rs 63,200

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app