IAS अधिकाऱ्यापेक्षा जास्त पगार; इन्व्हेस्टमेंट बँकर्स नेमके कोण असतात? काय काम करतात? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:24 IST2026-01-23T13:23:22+5:302026-01-23T13:24:35+5:30

Investment Banker Job: अलिकडच्या काळात इन्व्हेस्टमेंट बँकिंग करिअरकडे तरुणांचा कल वाढतोय!

Investment Banker Job: Salary of crores of rupees, better job than IAS; Who exactly are investment bankers? What do they do? | IAS अधिकाऱ्यापेक्षा जास्त पगार; इन्व्हेस्टमेंट बँकर्स नेमके कोण असतात? काय काम करतात? जाणून घ्या

IAS अधिकाऱ्यापेक्षा जास्त पगार; इन्व्हेस्टमेंट बँकर्स नेमके कोण असतात? काय काम करतात? जाणून घ्या

Investment Banker Job: भारतामध्ये IAS अधिकारी बनणे हे लाखो तरुणांचे स्वप्न आहे. प्रतिष्ठा, सत्ता आणि समाजावर प्रभाव टाकण्याची संधी...यामुळे IAS सेवेला विशेष महत्त्व दिले जाते. मात्र अलिकडच्या काळात एका वेगळ्याच करिअरकडे तरुणांचा कल वाढताना दिसतो आहे. हे क्षेत्र म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकर!

उच्च पगार, आंतरराष्ट्रीय संधी आणि कॉर्पोरेट जगतातील प्रभावामुळे अनेक जण आता IAS ऐवजी इन्व्हेस्टमेंट बँकिंगकडे वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत इन्व्हेस्टमेंट बँकर नेमके कोण असतात, त्यांचे काम काय असते, पगार किती मिळतो आणि हे करिअर कसे घडवता येते? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणजे कोण?

इन्व्हेस्टमेंट बँकर हे वित्त क्षेत्रातील उच्च दर्जाचे व्यावसायिक असतात. मोठ्या कंपन्यांना भांडवल उभारण्यात मदत करणे हे त्यांचे मुख्य काम असते. कंपनीचा IPO, बाँड्स, शेअर्स जारी करणे, तसेच विलीनीकरण आणि अधिग्रहण यांसारख्या मोठ्या आर्थिक व्यवहारांची आखणी इन्व्हेस्टमेंट बँकर करतात.

याशिवाय, सरकार किंवा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना आर्थिक धोरणांबाबत सल्ला देणे, कोट्यवधी-अब्जावधी रुपयांच्या डील्सचे स्ट्रक्चर तयार करणे, ही जबाबदारीही त्यांच्यावर असते. एखादा भारतीय उद्योगपती परदेशी कंपनी विकत घेणार असेल, तर त्या संपूर्ण व्यवहाराची रुपरेषा इन्व्हेस्टमेंट बँकर तयार करतो.

इन्व्हेस्टमेंट बँकरचा पगार किती?

पगाराच्या बाबतीत इन्व्हेस्टमेंट बँकिंग हे क्षेत्र अत्यंत आकर्षक मानले जाते. ज्युनियर लेव्हलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार साधारणपणे दरमहा १ ते १.५ लाख रुपयांपासून सुरू होतो. अनुभव वाढल्यानंतर आणि वरिष्ठ पदावर गेल्यावर हा पगार कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचतो. काही टॉप इन्व्हेस्टमेंट बँकरचा वार्षिक पगार १० कोटी रुपयांहून अधिक असल्याचेही उदाहरणे आहेत. याशिवाय, या क्षेत्रात बोनस हा पगाराचा मोठा भाग असतो. एखाद्या यशस्वी डीलनंतर मिळणारा बोनस अनेकदा मूळ पगारापेक्षा जास्त असू शकतो.

इन्व्हेस्टमेंट बँकर कसे बनावे?

इन्व्हेस्टमेंट बँकर होण्यासाठी मजबूत शैक्षणिक पाया आवश्यक असतो. B.Com, Economics किंवा Finance सारखी पदवी, त्यानंतर MBA (विशेषतः Finance मध्ये) केल्यास संधी वाढतात. IIM आणि इतर नामांकित बिझनेस स्कूल्समधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात प्रवेश तुलनेने सोपा जातो. 

याशिवाय, CA (चार्टर्ड अकाउंटंट) झालेल्या उमेदवारांनादेखील इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये लवकर संधी मिळतात. Financial Modeling, Valuation, Market Analysis आणि Corporate Finance यांचे सखोल ज्ञान असणे अत्यावश्यक आहे.

Web Title : इन्वेस्टमेंट बैंकिंग: आईएएस से ज़्यादा वेतन, करियर, जानकारी

Web Summary : इन्वेस्टमेंट बैंकर कंपनियों को आईपीओ और विलय के माध्यम से पूंजी जुटाने में मदद करते हैं। वेतन अनुभव और बोनस के साथ करोड़ों तक पहुंचता है। वित्त डिग्री और एमबीए इस करियर के लिए ज़रूरी हैं।

Web Title : Investment Banking: Lucrative Career, Higher Pay Than IAS, Details Here

Web Summary : Investment bankers help companies raise capital via IPOs and mergers. Salaries start high, reaching crores with experience and bonuses. A finance degree and MBA are key for this career.