रेल्वेत 2,570 पदांची भरती; अर्ज कसा भरायचा? शेवटची तारीख काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:35 IST2025-09-30T14:35:14+5:302025-09-30T14:35:53+5:30
Indian Railway Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे.

रेल्वेत 2,570 पदांची भरती; अर्ज कसा भरायचा? शेवटची तारीख काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
Indian Railway Recruitment : सरकारीनोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय रेल्वेने मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) ज्युनिअर इंजिनिअर (JE), डिपो मटेरियल सुपरिटेंडंट (DMS), केमिकल व मेटलर्जिकल असिस्टंट या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 2,570 पदे भरली जाणार आहेत.
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल. तर, उमेदवार 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. सर्व अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. कोणतेही ऑफलाइन फॉर्म ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ rrbguwahati.gov.in ला भेट द्यावी.
उपलब्ध पदे
ज्युनिअर इंजिनिअर (JE)
डिपो मटेरियल सुपरिटेंडंट (DMS)
केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट
वेतनमान
निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल-6 पे स्केल नुसार प्रतिमहिना ₹35,400 वेतन मिळेल. याशिवाय रेल्वे इतर भत्ते, पेंशन, मेडिकल सुविधा, प्रवास सवलत आदी लाभ मिळतील.
वयोमर्यादा
किमान वय : 18 वर्षे
कमाल वय : 33 वर्षे
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ rrbguwahati.gov.in ला भेट द्यावी.
Apply Online या लिंकवर क्लिक करावे.
प्रथम नोंदणी (Registration) करुन मूलभूत माहिती भरावी.
लॉगिन करुन शैक्षणिक माहिती व इतर तपशील भरावेत.
आवश्यक कागदपत्रे (फोटो, स्वाक्षरी व प्रमाणपत्रे) स्कॅन करुन अपलोड करावीत.
अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे.
सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करुन प्रिंटआउट काढून ठेवा.