Indian Railway Job: १०वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेविना थेट भरती, एवढी पदे भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 09:04 AM2022-05-05T09:04:58+5:302022-05-05T09:21:24+5:30

Indian Railway Job: या भरती अभियानाच्या माध्यमातून विविध ट्रेड्समध्ये एकूण १०३३ पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागण्याची प्रक्रिया २५ एप्रिल २०२२ पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार २४ मे किंवा त्याआधी ऑनलाईन मोडमद्ये अर्ज करू शकतात.

Indian Railway Job: 10th Pass Candidates will get golden job opportunities in Railways, Direct Recruitment without Examination, Recruitment for 1033 posts | Indian Railway Job: १०वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेविना थेट भरती, एवढी पदे भरणार

Indian Railway Job: १०वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेविना थेट भरती, एवढी पदे भरणार

googlenewsNext

नवी दिल्ली - दहावी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये वेल्डर, टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशन, स्टेनोग्राफर (हिंदी, इंग्रजी), मशिनिस्ट यांसह विविध ट्रेड्समध्ये अप्रेंटिसशिप पदांवर अर्ज मागितले आहे. या भरती अभियानाच्या माध्यमातून विविध ट्रेड्समध्ये एकूण १०३३ पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागण्याची प्रक्रिया २५ एप्रिल २०२२ पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार २४ मे किंवा त्याआधी ऑनलाईन मोडमद्ये अर्ज करू शकतात.

एसईसीआर रेल्वे अप्रेंटिस भरती २०२२ मध्ये डीआरएम ऑफिस, रायपूर डिव्हिजनमध्ये एकूण ६९६ अप्रेंटिंस पदे आणि वेगन रिपेअर शॉप, रायपूरमद्ये एकूण ३३७ अप्रेंटिस पदांचा समावेश आहे. ट्रेड वाइज व्हेकन्सी डिटेल्स खाली दिलेल्या नोटिफिकेशनमध्ये तपासून घेऊ शकता. अप्रेंटिस पोस्टवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत दिली जाईल, अधिका माहितीसाठी नोटिफिकेशन पाहा.

रेल्वे अप्रेंटिस पदांवर भरतीसाठी उमेदवारांची कुठलीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. तर केवळ मॅट्रिक (दहावी) परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांच्या किंवा टक्केवारीच्या आधारावर तयार केलेल्या मेरिट लिस्टनुसार उमेदवाराची निवड केली जाईल.

इच्छुक आणि पात्र उमेदवारा अप्रेंटिसशिप इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर  apprenticeshipindia.org  जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्जाची हार्ड कॉपी स्वीकारली जाणार नाही. उमेदवारा केवळ ऑनलाईन मोडमध्येच अर्ज करू शकतील.  

Web Title: Indian Railway Job: 10th Pass Candidates will get golden job opportunities in Railways, Direct Recruitment without Examination, Recruitment for 1033 posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.