सरकारीनोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी विविध पदांची भरती केली जाणार आहे. एचपीसीएलने सध्या शॉर्ट नोटीस प्रसिद्ध केली असून लवकरच अधिसूचना लवकरच जारी केली जाईल. पदवीधर आणि पदविका धारकांसाठी करिअर घडवण्याची ही उत्तम संधी आहे.
या भरतीअंतर्गत ग्रॅज्युएट इंजिनिअर, डिप्लोमा इंजिनिअर, क्विलिटी इंजिनिअर, फायन अॅण्ड सेफ्टी, फायनान्स, एचआर, इन्फॉर्मेशन सिस्टम्स, हिंदी ऑफिसर आणि जूनियर एक्झिक्यूटीव्ह असिस्टेंट पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २५ फेब्रुवारी २०२६ पासून अधिकृत वेबसाइटवर सुरू होणार आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एचपीएलसीएलच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.
अर्ज कसा करायचा?
- सर्वात प्रथम, उमेदवारांनी www.hindustanpetroleum.com या अधिकृत बेवसाइटला भेट द्यावी.- नंतर, नाव, मोबाईल नंबर, इमेल आयडी टाकून नोंदणी करावी.- पुढे, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.- वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा.- फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करा.- नेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
Web Summary : Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) offers freshers and experienced candidates a golden job opportunity. Various positions are available, including engineering, finance, HR, and IT roles. Online applications start February 25, 2026. Visit www.hindustanpetroleum.com for details.
Web Summary : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) फ्रेशर्स और अनुभवी उम्मीदवारों के लिए नौकरी का सुनहरा अवसर लाया है। इंजीनियरिंग, वित्त, मानव संसाधन और आईटी सहित विभिन्न पदों के लिए आवेदन करें। ऑनलाइन आवेदन 25 फरवरी 2026 से शुरू। विवरण के लिए www.hindustanpetroleum.com पर जाएं।