How can I earn beyond my salary if I only have a job share market blogging e commerce | एकच जॉब करताय आणि बँक बॅलन्सही वाढवायचाय? पाहा कमाईचे काही अन्य मार्ग

एकच जॉब करताय आणि बँक बॅलन्सही वाढवायचाय? पाहा कमाईचे काही अन्य मार्ग

ठळक मुद्देजोखमीचं असलं तरी शेअर बाजारातील गुंतवणूकही ठरू शकते फायद्याचीदेशात वेगानं वाढत असलेला ई-कॉमर्स कंपन्यांसोबतच्या व्यवसायामुळेही होऊ शकते अतिरिक्त कमाई

अनेकदा आपल्यासमोर पैशाचा मोठा प्रश्न उभा असतो. आपल्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा अधिक कमाई करण्याची संधी मिळते का याचीदेखील आपण वाट पाहत असतो. आपलं करत असलेलं काम सुरू ठेवूनही कमाई कमण्याचे अनेक मार्ग आपल्यासमोर आहेत. फक्त ते मार्ग शोधण्याची गरज आपल्याला असते. आपण काही असे मार्ग पाहूया ज्यामुळे तुम्हाला एक संधीही मिळेल आणि तुमचा बँक बॅलन्स नक्कीच वाढू शकतो. 

शेअर बाजारात गुंतवणूक

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असली तरी आपल्या शेअर बाजाराचा कल यशाकडे आणि आशेकडे आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला शोधून सापडतील ज्यात काही लोकांनी स्मार्टपणे गुंतवणूक करून मोठा नफाही कमावला आहे. दीर्घ कालावधीसाठी केलेल्या गुंतवणूकीत शेअर बाजारानं गुंतवणूकदारांना सातत्यानं मोठा परतावा दिला आहे आणि अनेक लोक याला पैसे कमवण्याचा सुरक्षित पर्यायही मानतात. थोडा विचार करून गुंतवणूक केल्याल आपल्याला मोठ्या प्रमाणात यातून नफाही मिळू शकतो. 

फ्रिलांसिंग

अतिरिक्त कमाई करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे फ्रिलांसिंग करणं. हा देखील एक लोकप्रिय मार्ग आहे. अशा अनेक वेबसाईट्स आणि अॅप्स आहेत जे फ्रिलांन्सर्सच्या शोधात असतात. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर करून नक्कीच आपल्याला अतिरिक्त कमाई करता येऊ शकते. जेव्हा तुमच्याकडे फ्रिलांसिंगचा दीर्घ अनुभव असेल त्यावेळी तुम्ही अधिक कमाईचीही अपेक्षा करू शकाल.

ई-कॉमर्स

भारतात गेल्या १५ वर्षांपासून ई-कॉमर्सचा व्यवसाय झपाट्यानं वाढत आहे. ई-कॉमर्समुळे अनेक छोट्या व्यापाऱ्यांना आपल्या वस्तू मोठ्या प्लॅटफॉर्मवर विकण्याची संधी मिळते. जर कोणाला छोटा व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर ती व्यक्ती सहजरित्या या व्यापारात उतरू शकते. या क्षेत्राची व्याप्ती मोठी असल्यामुळे अपेक्षित यशही मिळण्याची तितकीच शक्यता असते. 

ब्लॉगिंग

ब्लॉगिंग हा एक एव्हरग्रिन विचार असल्याचं म्हटलं जातं. आपले विचार इंटरनेटच्या माध्यमातून मांडून त्याद्वारे काणी करण्यापेक्षा काहीही उत्तम नाही. ब्लॉगिंगसाठी कोणत्या सेटअपची किंवा गुंतवणुकीची आवश्यकता नसते. तसंच यासाठी कोणती वेळेची मर्यादाही नसते. सध्या संधी आणि कौशल्याची आपल्याकडे कोणतीही कमी नाही. एखाद्यानं संधीचा शोधून त्यात स्वत:ला झोकून देणं आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या पगाराव्यतिरिक्त अधिक कमाईची संधी शोधत असाल तर वरील पर्यायांचा नक्कीच विचार करू शकता किंवा नवा पर्यायही शोधू शकता. 

Web Title: How can I earn beyond my salary if I only have a job share market blogging e commerce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.