GAIL: पदवीधरांसाठी गूड न्यूज! 'गेल' इंडियामध्ये मोठी भरती; १.८० लाखांपर्यंत पगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 14:57 IST2026-02-23T14:56:20+5:302026-02-23T14:57:45+5:30
GAIL Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

GAIL: पदवीधरांसाठी गूड न्यूज! 'गेल' इंडियामध्ये मोठी भरती; १.८० लाखांपर्यंत पगार
सरकारीनोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. 'गेल (इंडिया) लिमिटेडद्वारे अभियांत्रिकी पदवीधरांसाठी मोठ्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. GATE-2026 च्या गुणांच्या आधारे एक्झिक्युटीव्ह ट्रेनी या पदांसाठी ही निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. पात्र उमेदवारांना कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येईल.
या भरती मोहिमेअंतर्गत विविध विभागांतील एकूण ७० रिक्त पदे भरली जाणार आहेत, ज्यात एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (केमिकल)- १७ जागा, एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन)- २१ जागा, एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (इलेक्ट्रिकल)- १६ आणि एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (मेकॅनिकल)- १६ जागांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी गेल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
पात्रता:
सर्व पदांसाठी उमेदवारांनी संबंधित अभियांत्रिकी शाखेत किमान ६५ टक्के गुणांसह बॅचलर पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच, GATE 2026 मधील संबंधित विषयाचा पेपर अनिवार्य आहे.
एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (केमिकल): केमिकल, पेट्रोकेमिकल्स किंवा केमिकल टेक्नॉलॉजी पदवी (GATE पेपर: CH).
एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन): इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा संबंधित पदवी (GATE पेपर: IN).
एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (इलेक्ट्रिकल): इलेक्ट्रिकल किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी (GATE पेपर: EE).
एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (मेकॅनिकल): मेकॅनिकल किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी (GATE पेपर: ME).
वेतन:
निवड झालेल्या उमेदवारांना 'गेल' इंडियामध्ये सन्मानजनक पगार दिला जाईल. कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदासाठी ₹६०,००० ते ₹१,८०,००० दरम्यान वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया:
-सर्वात प्रथम गेल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- त्यानंतर "Recruitment" पर्यायावर क्लिक करा.
- GATE-2026 executive Recruitment यावर क्लिक करा.
- ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा
- शैक्षणिक तपशील, GATE-2026 नोंदणी क्रमांक भरा आणि फोटो-स्वाक्षरी अपलोड करून अर्ज सबमिट करा.