Metaverse: फेसबुकचं 3D जग, १० हजार जणांना नोकरीची संधी; जाणून घ्या मार्क जुकरबर्गचा बिग प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 08:36 AM2021-10-19T08:36:10+5:302021-10-19T08:41:13+5:30

फेसबुकनं २०१४ मध्ये वर्चुअल रिएलिटी हेडसेट्स बनवणारी कंपनी Oculus ला २ बिलियन डॉलर्समध्ये खरेदी केली होती

Facebook plans to hire 10,000 in European Union to build 'Metaverse' | Metaverse: फेसबुकचं 3D जग, १० हजार जणांना नोकरीची संधी; जाणून घ्या मार्क जुकरबर्गचा बिग प्लॅन?

Metaverse: फेसबुकचं 3D जग, १० हजार जणांना नोकरीची संधी; जाणून घ्या मार्क जुकरबर्गचा बिग प्लॅन?

Next
ठळक मुद्देकंपनी सोशल मीडियात राहण्याशिवाय पुढील ५ वर्षात एक मेटावर्स कंपनीची निर्मिती करेल.Horizon डेवलेप करत आहे. हे एक असं डिजिटल जग असेल ज्याठिकाणी लोक VR टेकच्या सहाय्याने एकमेकांशी संवाद साधतील.पुढील ५ वर्षात यूरोपियन यूनियनमध्ये १० हजार हाई स्किल्ड जॉब निर्माण करणार

पॅरिस – सोशल मीडियामधील दिग्गज कंपनी Facebook नं सोमवारी इंटरनेटच्या वर्चुअल रिएलिटी वर्जन Metaverse बनवण्यासाठी यूरोपियन यूनियन देशांमध्ये १० हजार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली. फेसबुक या डिजिटल वर्ल्डला पुढील येणारं भविष्य मानत आहे. मेटावर्सची संकल्पना प्रत्यक्षात उतरली तर वास्तविक आणि आभासी जगामधील अंतर कमी होईल असं कंपनीचे CEO मार्क जुकरबर्ग यांनी दावा केला आहे.

या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कुणीही वर्चुअल रिएलिटी ग्लासेज घातल्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत समोरासमोर बसून बोलतोय असा भास होईल. मग त्याचा मित्र भलेही साता समुद्रापार असला तरी दोघं इंटरनेटच्या मदतीने एकमेकांशी जोडले जातील. फेसबुकनं एका ब्लॉगपोस्टमध्ये लिहिलंय की, या मेटावर्समध्ये नवीन रचनात्मक, सामाजिक आणि आर्थिक शक्यतांचे दरवाजे उघडण्याची क्षमता आहे. यूरोपियन याच्या सुरुवातीला आकार देण्याचं काम करतील. पुढील ५ वर्षात यूरोपियन यूनियनमध्ये १० हजार हाई स्किल्ड जॉब निर्माण करणार असल्याचं फेसबुकनं सांगितले. हायरिंग करताना हाईल स्पेशलाइज्ड इंजिनिअर्सचा समावेश असेल परंतु याबाबत अधिक माहिती स्पष्ट केली नाही.

लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न?

Facebook ने ही घोषणा तेव्हा केली आहे जेव्हा अनेक प्रकारच्या वादग्रस्त मुद्द्यात कंपनी चर्चेत आहे. मागील २-३ आठवड्यात दोनदा आऊटेज समस्येचा सामना करावा लागला. तसेच फेसबुकवर नियंत्रण आणण्यासाठी नियम करावेत अशी मागणी होत आहे. एका माजी कर्मचाऱ्याच्या खुलाशानंतर फेसबुक वादात अडकला होता. हा कर्मचारी Franes Haugen ने इंटरनल स्टडीजच्या तथ्यांवर भाष्य करत म्हटलं होतं की, फेसबुकमुळे युवकाच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे याची कल्पना कंपनीला आहे. जुकरबर्गने सांगितले की, कंपनी सोशल मीडियात राहण्याशिवाय पुढील ५ वर्षात एक मेटावर्स कंपनीची निर्मिती करेल.

फेसबुकनं २०१४ मध्ये वर्चुअल रिएलिटी हेडसेट्स बनवणारी कंपनी Oculus ला २ बिलियन डॉलर्समध्ये खरेदी केली होती. तेव्हापासून Horizon डेवलेप करत आहे. हे एक असं डिजिटल जग असेल ज्याठिकाणी लोक VR टेकच्या सहाय्याने एकमेकांशी संवाद साधतील. ऑगस्टमध्ये Horizon Workrooms ची सुरुवात झाली होती. हे एक असा फिचर आहे. हे एक असं फिचर आहे ज्यात कंपनीचे कर्मचारी VR हेडसेट्स घालून एक वर्चुअल रुममध्ये बैठक करू शकतात. या वर्चुअल रिएलिटीमध्ये कार्टूनिश 3D वर्जन दाखवेल.

Web Title: Facebook plans to hire 10,000 in European Union to build 'Metaverse'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app