शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -:घटक- सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 10:36 AM

घटक- सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या

ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -: विषय-गणितघटक- सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -: विषय-गणित,घटक- सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या

महत्त्वाचे मुद्दे -(1) समसंख्या- सम संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कोणताही अंक असतो.(2) विषम संख्या- विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक असतो.(3) मूळ संख्या व संयुक्त संख्या* 1 ते 100 संख्यामध्ये 25 मूळ संख्या आहेत.* 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे.* 2 सोडून बाकीच्या 24 मूळसंख्या या विषममूळ संख्या आहेत.* 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत.* 1 ही संख्या मूळ किंवा संयुक्त संख्या नाही.संख्यागट       मूळसंख्या                 संख्यागट       मूळसंख्या1 ते 10               2, 3, 5, 7             51 ते 60            53, 5911 ते 20           11, 13, 17, 19        61 ते 70            61, 6721 ते 30            23, 29                 71 ते 80            71, 73, 7931 ते 40           31, 37                   81 ते 90           83, 8941 ते 50           41, 43, 47            91 ते 100         97* एकअंकी मूळसंख्या- 2, 3, 5, 7 अशा 4 आहेत.* दोनअंकी मूळसंख्या 21 आहेत.* जोडमूळ संख्या - 1 ते 100 च्या दरम्यान जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत.(1) 3, 5 (2) 5, 7 (3) 11, 13 (4) 17, 19 (5) 29, 31 (6) 41, 43 (7) 59, 61 (8) 71, 73* दोन मूळसंख्यांत 2 चा फरक असतो. त्या मूळसंख्या जोडमूळ किंवा जुळ्या मूळसंख्या असतात.सहमूळसंख्या- कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सममूळ संख्यांची जोडी असते.उदा. 7, 8, 11, 12, 23, 24, 25, 26 इ.सोडविलेली उदाहरणे -(1) 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान किती मूळसंख्या आहेत?(1) 8 (2) 15 (3) 25 (4) 24स्पष्टीकरण - 1 ते 100 दरम्यान 25 मूळसंख्या आहेत.(2) पुढीलपैकी जोडमूळसंख्या कोणती?(1) 11, 19 (2) 59, 61 (3) 13, 15 (4) 71, 75स्पष्टीकरण - 59, 61 ही जोडमूळसंख्या आहे.(3) जर दोन मूळसंख्यांचा गुणाकार सम असेल, तर त्यापैकी एक मूळसंख्या कोणती असेल?(1) 3 (2) 2 (3) 5 (4) 97स्पष्टीकरण- दोन मूळसंख्यांचा गुणाकार सम असेल त्यातील एक संख्या सममूळ म्हणजे 2 असणारउदा. 2 व 7 मूळसंख्या आहेत.2७7 = 14 सम गुणाकार येतो.(4) पुढीलपैकी कोणती जोडमूळसंख्या नाही?(1) 7, 9 (2) 11, 13 (3) 59, 61 (4) 29, 31स्पष्टीकरण- पर्याय क्र. 1 मध्ये 9 ही संयुक्त आहे.(5) खालीलपैकी सहमूळ संख्यांची जोडी कोणती?(1) 31, 33 (2) 22, 33 (3) 25, 36 (4) 9, 12स्पष्टीकरण- पर्याय क्र. 1 मध्ये सहमूळ संख्या आहेत, कारण त्या दोघांचा सामाईक विभाजक 1 हा आहे.नमुना प्रश्न -(1) 1 ते 20 मधील मूळ संख्यांची बेरीज किती?(1) 78 (2) 77 (3) 79 (4) 87(2) खालीलपैकी फक्त मूळ संख्यांचा गट कोणता?(1) 5, 15, 13 (2) 79, 89 (3) 59, 87 4) 7, 17, 33(3) 1 ते 100 मधील सर्वांत मोठ्या व सर्वात लहान मूळ संख्येतील फरक किती?(1) 97 (2) 95 (3) 96 (4) 99(4) 79 च्या मागे क्रमाने येणारी 8 वी संयुक्त संख्या कोणती?(1) 69 (2) 68 (3) 71 (4) 70(5) 10 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची सरासरी किती?(1) 60 (2) 15 (3) 58 (4) 13(6) खालीलपैकी संयुक्त संख्यांचा गट ओळखा.(1) 2, 5, 7 (2) 11, 13, 17 (3) 41, 44, 47 (4) 91, 93, 99(7) 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व गुणाकार यात कितीचा फरक आहे?(1) 190 (2) 183 (3) 210 (4) 193(8) दोनअंकी संयुक्त संख्या किती?(1) 74 (2) 69 (3) 73 (4) 75(9) सम आणि मूळ असणारी संख्या कोणती?(1) 1 (2) 2 (3) 3 (4) 4(10) कोणती संख्या मूळ व संयुक्त संख्या नाही?(1) 1 (2) 2 (3) 3 (4) 7(11) दोनअंकी सम संख्या एकूण किती?(1) 44 (2) 50 (3) 45 (4) 46(12) 200 च्या पुढील दुसरी विषम संख्या व आठवी सम संख्या यांची बेरीज किती?(1) 419 (2)418 (3) 216 (4) 203(13) 1 ते 200 मधील सममूळ संख्या किती आहेत?(1) 108 (2) 310 (3) 1 (4) यापैकी नाही(14) 11 ते 30 मधील सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?(1) 5 (2) 10 (3) 13 (4) 9(15) 51, 53, 23, 45, 91, 34, 74, 67, 78, 88, 47 वरील दिलेल्या संख्यांमधील प्रत्येक संख्येच्या अंकांची आदलाबदल केली असता किती विषम संख्या तयार होतील.(1) 5 (2) 6 (3) 7 (4) 8उत्तरसूची :(1) 2 (2) 2 (3) 3 (4) 1 (5) 2 (6) 4 (7) 4 (8) 1 (9) 2 (10) 1 (11) 3 (12) 1 (13) 3 (14) 2 (15) 2 

संकलक : तारीश आत्तारजि. प. शाळा, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTarish Attarतारीश आत्तार