Etc. 5th scholarship exam, subject-maharashtra, element - find different meaning of the same word. | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे.
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे.

ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 32 विषय-मराठी, घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे

    इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा,  विषय-मराठी, घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे.

महत्त्वाचे शब्द :

 •  माया-ममता , मुलीचे नाव, कपडे शिवताना सोडलेली जागा
 •  घाट - डोंगरातील रस्ता, नदीच्या पायऱ्या
 • तीर- काठ, बाण,
 • धड- शरीराचा भाग, अखंड स्पष्टपणे
 • काळ- वेळ, मृत्यू, यम
 •  ओढा- मनाचा कल, पाण्याचा प्रवाह
 •  अंक- मांडी, संख्या, नाटकाचा भाग
 •  डाव- कारस्थान, कपट, खेळी
 • द्वीज- पक्षी, ब्राम्हण
 •  कळ- भांडणाचे कारण, वेदना, किल्ली
 •  दंड- शिक्षा, बाहू, काठी
 •  सुमन- पवित्र मन, फूल नाव
 • हार- पराभव, फुलांची माळ
 • वर- आशीर्वाद, वरची दिशा, लग्न ठरलेला पुरूष
 •  पेय- पाणी, दूध
 •  नाद- छंद, आवाज
 •  पर- परका, पीस, माशाचा अवयव
 •  पात्र- भांडे, लायक, नदीचे पात्र, नाटकातील भूमिका
 • पूर- नगर, पाण्याचा पूर
 •  घट- लहान मडके, तोटा
 •  भाव- किंमत, भावना
 • कर- हात, सारा
 • विभूती- महान पुरूष, अंगारा, भस्म, रक्षा
 • सूत- धागा, सारथी
 • वात- वारा, विकार, दिव्याची वात
 • वास- गंध, वस्ती
 •  वारी- पाणी, नियमित फेरी
 • वाली- रक्षणकर्ता, एका वानराचे नाव
 • भेट- भेटणे, नजराणा
 • मान- मोठेपणा, शरीराचा भाग
 • दल- सैन्य, पान
 •  जलद- ढग, लवकर
   
 • नमुना प्रश्न :
   
 • अधोरिखत शब्दाचा अचूक अर्थ, दिलेल्या पर्यायातून शोधा व पर्याय क्रमांक रंगवा
   

(1)  प्रतिपक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला (2017)
(1) माळ (2) पराभव (3) दागिना (4) ओझे

(2) ‘ मनी नाही भाव आणि देवा मला पाव’
(1) दर (2) गर्व (3) भक्ती (4) किंमत

(3) माझ्या भावाला कारल्यांचा भाव जास्तच वाटला
(1) भाऊ (2) अंदाज (3) दर (4) हिशेब

(4) सैनिकांनी सीमेवर खडा पहारा दिला.
(1) लहान दगड (2) उभे (3) सशस्त्र (4) दिला

(5) त्याच्या पोटात कळ आली
(1) किल्ली (2) वेदना (3) कळी 4) कलह

(6) ‘तीर’ या शब्दाचे दोन भिन्न अर्थ असलेला पर्याय ओळखा.
(1) पाठ, कमान (2) धनुष्य, दोरी (3) बाण, काठ (4) बाण, धनुष्य

( 7) त्याने आपल्या करांनी कर भरला
(1) हात (2) सारा (3) काम (4) पैसे

(8) सुमनने सुमनाने सुमन वाहिले.
(1) चांगली भावना (2) मुलगीचे नाव (3) फूल (4) हात

उत्तरसूची :
(1) 2 (2) 3 (3) 3 (4) 3 (5) 2 (6) 3 (7) 2 (8) 1

 

जिल्हा परिषद शाळा खरशिंग ता. कवठेमहांकाळ

Web Title: Etc. 5th scholarship exam, subject-maharashtra, element - find different meaning of the same word.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.